Nashik: दोन आठवड्यांपूर्वी महायुतीला विधानसभेसाठी पूर्ण पाठिंबा दिल्यानंतर महायुतीकडून दुरावलेल्या शिख समाजासाठी इतिहासातील पहिली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीकडून आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषदेची तयारी सुरु झाल्याचं सांगण्यात येत आहे. शीख समुदायाचा या समितीचा सरकारला फायदा होणार असल्याचे देखील या बैठकीतून दिसून येत आहे.विधानसभेत शिख समाजानं महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिख समाजाची पहिली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. आजपर्यंत शिख समुदाय कुठल्याच सरकारच्या बाजूने पूर्णपणे नव्हता मात्र या बैठकांनी पुन्हा शिखांना सरकार बरोबर घेत पुढे जाईल का याकडे आता लक्ष आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मराठा दलित मतांचा कल कुठे झुकेल याकडे महाराष्ट्राचे लक्ष असताना शिख समाजाचा महायुतीला मिळालेला पाठिंब्याने राज्यातील किमान १२० जागांवर परिणाम होऊ शकतो असं महाराष्ट्र शीख असोसिएशनचे अध्यक्ष बाल मलकित म्हणाले होते. भाजपला मिळालेल्या शीखांच्या पाठिंब्यानंतर सिख समजाच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम ही समन्वय समिती करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिख समाजासाठी विशेष समिती
महाराष्ट्र सरकारने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिख आणि सिकलीकर समाजाकरता विशेष समिती स्थापन करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. या समितीमध्ये 11 मेंबर घेण्यात आले असून हे शिख समाजाचे महाराष्ट्रातील मुख्य गुरुद्वारांचे पदाधिकारी आहेत. महाराष्ट्रात नाशिकसह बीड जिल्ह्यातही शिख समुदायाच्या बैठका घेऊन या समितीचा लाभ कशा प्रकारे होऊ शकतो याची माहिती देण्यात येत आहे.शिख समाजाच्या तळागाळातील पोहोचलेल्या अडीअडचणी जाणून घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. या समितीसाठी लवकरच मोठे बजेट दिले जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.शनिवारी नाशिक शहरातील सेलिब्रेशन लॉन्च या ठिकाणी शिख समुदायातील , सिकलीकर या समाजाच्या सोबत बैठक घेऊन त्यांना सरकार बरोबर येण्याचे आवाहन करण्यात आले.आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये नक्कीच सिख समुदायाचा या समितीचा सरकारला फायदा होणार असल्याचे देखील या बैठकीतून दिसून येत असल्याचं सांगण्यात येतंय. शीख समाजाच्या आतापर्यंतच्या पहिल्या जासिक समुदायाच्या जिल्हा बीड जिल्ह्यात बैठका सुरू आहेत.