Maharashtra Politicis News : मुख्यमंत्री (Chief Minister) आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर आता राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार (Expansion of the state cabinet) कधी होणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच कोणत्या पक्षाला कोणती पदं मिळणार याबाबतही चर्चा सुरु आहे. याबाबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिपदाच्या आकड्यांवरुन लक्षात घेतलं तर भाजप स्वतःवरच अन्याय करुन घेईल पण मित्रांवर अन्याय करणार नाही असे मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर विविध चर्चा सुरु आहेत. याबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले. या चर्चा म्हणजे साबणावरील फेस आहे.
मंत्रीमंडळ विस्तारात कोणाला किती जागा मिळणार? भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला किती? आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार याची चर्चा सुरु आहे. यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे लक्षात ठेवा. मंत्रिपदाचा आकड्यांवरून लक्षात घेतलं तर अन्याय भाजप स्वतःवरच अन्याय करून घेईल पण मित्रांवर अन्याय करणार नाही असे ते म्हणाले. खातेवाटपावरुन सुरू झालेली चर्चा तुम्हीच सुरु केली आहे. प्रमुख 35 खात्यांचा प्रश्न आहे. राज्यव्यापी 11 विभाग आहेत, त्याचं तिन्ही पक्षात योग्य विभाजन होईल असेही मुनगंटीवार म्हणाले.
वन नेशन वन इलेक्शन देशासाठी आवश्यक
वन नेशन वन इलेक्शन समितीत मी होतो. या गोष्टीची आवश्यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद व इतर निवडणुकांमुळं 300 हून अधिक दिवस आचारसंहितेत गेले हे मी निरीक्षण केलं होतं असेही मुनगंटीवार म्हणाले. वन नेशन वन इलेक्शन देशासाठी आवश्यक आहे. नेत्यांवरही प्रचाराचा भार येतो. 2029 मध्ये महिलांचाही सहभाग वाढणार आहे. तेव्हा एकत्रित निवडणुका झाल्या तर फायदाच आहे. संसदेत बिल येईल तेव्हा सविस्तर चर्चा होईल. प्रत्येक पक्षाला तर्कआधारित चर्चा करता येईल असेही मुनगंटीवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात कोणताही वाद नाही. अजितदादांनी शिंदेंचं कौतुक केलं आहे. आज त्या दोन्ही पक्षात स्पर्धा दिसत नाही. परिवारसारखे प्रेम या दोघांमध्ये असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. प्रत्येक पक्ष आपली नावे ठरवतो. चर्चा विभागावर होते. आग्रह असणं मान्य पण हट्ट नसावा असेही मुनगंटीवार म्हणाले. ईव्हीएमवर याच नेत्यांनी उठाबशा कराव्यात.
पराभव झाल्यावर ईव्हीएमच्या नावाने विरोधक ओरडतात
पराभव झाल्यावर ईव्हीएमच्या नावाने विरोधक ओरडतात. लोकसभेनंतर विरोधी पक्षाचे लोक मुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री पदाबाबत बोलत होते असेही मुनगंटीवार म्हणाले. त्यांनी जॅकेट शिवून ठेवले होते, निराश झालेत म्हणून ईव्हीएमला नावं ठेवत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
ईव्हीएमचा जन्मच काँग्रेसच्या काळात झाला आहे.
कुणीही कितीही कुणाच्याही जवळचा असला तरी देवेंद्रजी कठोर कारवाई करतील
बीड जिल्ह्यातील हत्या प्रकरणावर देखील मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली, असं राज्य देवेंद्रजींना मान्य नाही, कुणालाच माफी नाही. मुख्यमंत्री केजरीवाल असताना जेलमध्ये गेले होते. मी बीडच्या एसपीसोबत बोललो आहे. परळीतील खंडणी प्रकरणात शक्तीनिशी तपास करु असं एसपी म्हणाल्याचे मुनगंटीवार म्हणाले. कुणीही कितीही कुणाच्याही जवळचा असला तरी देवेंद्रजी कठोर कारवाई करतील. मी देवेंद्रजीच्या वतीने हा विश्वास बीड जिल्ह्याला देऊ इच्छितो असे मुनगंटीवार म्हणाले.