Maharashtra Politicis News : महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री (Maharashtra News CM) कोण होणार? याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे. दरम्यान, या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काळजी करायचं काही कारणचं नाही, कारण, राज्याचं नेतृत्व करायची संधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मिळणार असल्याचे दरेकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे आपल्या मागे उभे राहतात असंही ते म्हणाले.
भाजपच्या नेत्यांना वाटते की आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. भाजपमधून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हेच राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा शिवसेना शिंदे गटानं व्यक्त केली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळं कोण मुख्यमंत्री होणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच प्रविण दरेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना राज्याचं नेतृत्व करायची संधी मिळणार असल्याचे दरेकर म्हणाले.
आजचा दिवस हा मुंबई बॅकेसाठी सुवर्ण दिवस
आजचा दिवस हा मुंबई बॅकेसाठी सुवर्ण दिवस आहे. आम्ही सर्व सहकाऱ्यांनी 13 हजार कोटींचा पल्ला गाठला आहे. आताचं युग हे डिजिटल युग आहे. हौसिंग सोसायटीत मोबाइल बॅकिंग नसल्याच्या अनेक अडचणींना सामोरे जावं लागत होतं. त्यातच मोबाइल बॅकिंग म्हणजे पारदर्शकता मानली जाते. बँक नजीकच्या काळात 25 हजार कोटींचा टप्पा लवकरच गाठेल असे दरेकर म्हणाले. जिल्हा बॅक जरी असली तरी तेवढं पीक कर्ज नसतं, शासनाचं अनुदान नसतं.
लाडक्या बहिणीमुळे मुंबईत बँकेत 60 हजार महिलांची खाती
बँकेचा उपयोग सर्व सामान्यांसाठी झाला पाहिजे हा हेतू आहे. गिरणी कामगारांना पैसे दिले, घरं दिली. आपण पोलीस, शिक्षक सर्वांना पैसे दिल्याचे दरेकर म्हणाले. खासगी बँकेत पैसे ठेवून हे करता येत नाही. त्यासाठी सहकारातला पैसा सहकारातचं ठेवावा लागतो असे दरेकर म्हणाले. आपण एका बाजूला सामाजिक काम करतो दुसऱ्या बाजूला व्यवसायही करतो. मु़ंबई बँकेला आणखी सक्षम करावं ही विनंती सर्वांना करतो असे दरेकर म्हणाले. 60 हजार महिलांची खाती आज लाडक्या बहिणीमुळे आपल्या बँकेत झाल्याचे दरेकर म्हणाले. बँकेला शेड्युल बॅकेचा दर्जा मिळायला हवा यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे दरेकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: