Uday Samant On Deputy CM Post Of Maharashtra Goverment मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहे. दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी रात्री साडेनऊ वाजता ही बैठक होईल. अमित शाहांच्या भेटीसाठी अजित पवार सकाळीच दिल्लीत दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. तर एकनाथ शिंदे दुपारी 4 वाजता दिल्लीला रवाना होतील. या भेटीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटणार का, याची उत्सुकता आहे. 


अमित शाह आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या या बैठकीआधी शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. मागच्या पाच वर्षातही महायुतीला भरघोस पाठिंबा मिळाला. शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी त्याची व पक्षाची भूमिका स्पष्ट केली. संवेदनशील आणि बाळासाहेबांचा कडवट सैनिक काय असतो हे काल एकनाथ शिंदेनी दाखवून दिले. नरेंद्र मोदी आणि अमित शाह जे निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. राजकारणातला सुसंस्कृतपणा काल एकनाथ शिंदेंनी दाखवला. विरोधकांची कोल्हेकूई काल थांबली. एकनाथ शिंदेंवर टीका करणं, आता तरी विरोधकांनी थांबवावं, असं उदय सामंत यांनी सांगितले.


सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना- उदय सामंत


विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सर्वांच्याच मनात असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळताना दिसतंय. कारण महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी उदय सामंत यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांना उपमुख्यमंत्रिपदासाठी तुमच्या नावाची चर्चा सुरु आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर टीव्हीवर काय बातम्या येतात, त्याचा माझ्याशी काहीही संबध नाही. माझ्या राजकीय जीवनाचं काय करायचं, याचा मी सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना दिलेले आहेत. आमचे काही राजकीय निर्णय आहेत, ते देखील घेण्याचे अधिकार आम्ही एकनाथ शिंदेंना दिले आहेत. मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि भविष्यात देखील राहणार, असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले. 


बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा एकनाथ शिंदे पुढे घेऊन जाताय- उदय सामंत


भाषणात जमलेल्या हिंदु-बांधवांनो भगिणींनो म्हणणाऱ्यांना आता देशप्रेमी बोलावं लागत आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहे. 20 आमदार असलेल्या शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे. काँग्रेसच्या आदेशावर चालणाऱ्या पक्षाने आम्हाला शिकवू नये, अशी टीका उदय सामंत यांनी केली. तसेच महाविकास आघाडीमधील अनेक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहे. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर त्या गोष्टी लक्षात येईल, असा दावाही उदय सामंत यांनी यावेळी केला. 


उदय सामंत यांची संपूर्ण पत्रकार परिषद, VIDEO:



संबंधित बातमी:


Maharashtra Goverment: ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होणार, भाजपचा नवीन नियम; मंत्रिमंडळाआधी आमदारांची धाकधूक वाढली!