Maharashtra Political Crisis: सध्या राज्यात जे राजकारण चाललं आहे, हे शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं दिसत असले तरी या मागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. त्यामुळे हे सगळ घडतंय, असं म्हणायला वाव आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाही. भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे, हे समोर येईल, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी कल्याणात केलं आहे. कल्याण-डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खानदेश संघटनांतर्फे एकनाथ खडसे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.


या कार्यक्रमात बोलताना खडसे भावनिक झाले होते. यावेळी बोलताना मागील राजकीय प्रवसाबाबत बोलताना खडसे म्हणाले की, प्रमाणिकपने काम करून माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. जमिनीचे आरोप झाले, इतकं छळलय हे सांगण्यासाठी मी इथे उभा नाही. मात्र राजकारण इतक्या खालच्या स्तराला जातं, हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं. चौकशा झाल्या इथपर्यंत ठीक होतं. नंतरच्या कालखंडात माझ्या कुटुंबाला त्रास दिला, माझा जावयी , माझ्या दोन्ही मुली, माझी पत्नी, यांच्या मागे चौकशी लावली. सगळ कुटुंब आठवड्याला ईडी कार्यालयात बसायचे. मी काय गुन्हा केलाय, कुठे पैसे खाल्ले, काय घेतलं तुम्ही दाखवा ना? असा भावनिक त्यांनी सवाल केला.


ते पुढे म्हणाले की, मागच्या आठवड्यात माझ्या खात्यातले पैसे काढून टाकले. एक रुपया ठेवला नाही. पहिले खाते सिज केलं, आता पैसे काढून टाकले. त्यानंतर राहते घरं खाली 10 दिवसात खाली करण्याची नोटीस आली, असा नाथा भाऊने काय गुन्हा केला. न्यायालयातून जावून स्टे आणला म्हणून त्या घरात राहतोय, असं खालच्या स्तराचं राजकारण अनुभवलं नव्हतं. असं करायचं असतं तर अनेकांना मला छळता आलं असतं. माझ्या हातात इतकी ताकद आणि शक्ती आहे की, अनेकांना देशोधडीला लावू शकतो, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.