Presidential Elections 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत आम्ही जे गणित बांधले आहे, ते पाहता आमची स्थिती, खूप खराब आहे, असं नाही. मात्र मेहनत कारवी लागेल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहे. पवार आज दिल्लीत दाखल झाले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या समर्थनार्थ त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात बोलताना ते असे म्हणाले आहेत.
पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले आहेत की, ''जेव्हा आम्ही निवडणूक लढवतो, तर ती जिकंण्यासाठी लढवतो. मात्र जेव्हा दोन उमेदवार असतात, तेव्हा दोन्हीही जिंकणारच असं होत नाही. निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराची परिस्थिती वेगळी असू शकते. मात्र ही तत्वांची लढाई आहे. विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांची उमेदवार म्हणून निवड केली आहे. म्हणून आमची जबाबदारी आहे की, त्यांना जिंकून आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करायला हवेत. निकाल जो ही लागेल, तो नंतर पाहता येईल.''
आकडे पाहता विरोधी पक्षांचा उमेदवार कमकुवत दिसत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी पवार यांना केला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, आकडे जे ही दिसू द्या, म्हणून काय निवडणूक लढवायची नाही का? लोकसभा असो की विधानसभा, प्रत्येक निवडणूक आपल्या तत्वांच्या आधारे लढण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची असते. हीच गोष्ट लक्षात घेऊन आम्ही यात उतरलो आहोत.'' तत्पूर्वी यशवंत सिन्हा हे उद्या अर्ज दाखल करणार असल्याचं पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणीची तारीख 21 जुलै निश्चित करण्यात आली आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै 2022 रोजी संपत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Political Crisis : आता उदय सामंतही नॉट रिचेबल, एकनाथ शिंदे गटात सामिल होणार!
Sanjay Raut : संजय राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य, गुवाहाटीमधून 40 आमदारांचे मृतदेह येतील