Lok Sabha Election 2024 : संतोष चौधरी पवारांची साथ देतील, जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Lok Sabha Election 2024 : नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पाडल्यानंतर, आता सर्व EVM स्ट्रॅांग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्याय. कळमना APMC मार्केटमध्ये 4 जूनपर्यंत ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यात आल्याय. या स्ट्रॅांग रुममला तीन स्तरीय सुरक्षा असून, 24 तास केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलीस तैनात आहे. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील 4510मतदान केंद्रांवरील EVM स्ट्रॅांग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्याय.
मंडणगड : राजकारण अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिलेत. नरेंद्र मोदींना मत देऊ नका अशी मुस्लिम बांधवांना भीती दाखवली जातेय. उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहेत, त्यांनी मराठी माणसाला फसवलं आहे. मला फसवलं, बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, असं म्हणत रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. उध्दव ठाकरेंची नस नस मला माहितेय. सूर्यकांत दळवी आणि माझे मतभेद होते,पण पाच वेळा आमदार निवडून आलेल्या माणसाला विधान परिषद दिली नाही.
नाशिक : छगन भुजबळाना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आल्याने भुजबळ अध्यक्ष असलेल्या अखिल भारतीय समता परिषदेचे कार्यकर्त नाराज झालेत. समता परिषदेकडून त्यामुळे महायुतीच्या भुमिकेच्या निषेधाचे पत्रक काढण्यात आलय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी छगन भुजबळांना तिकीट देऊ केले होते मात्र राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी छगन भुजबळांची उमेदवारी हाणून पाडल्याचा आरोप समता परिषदेच्या कार्यकर्तानी केलाय.
Navi Mumbai : तळोजा सेक्टर ३४ आणि ३६ मध्ये २०१९ साली सिडकोने लॉटरी काढली. मात्र पाच वर्षे होत आले अजूनही सदनिका ताब्यात मिळत नाही. त्यात सिडकोने सदनिका लाभार्त्यांकडून विलंब शुल्क देखील आकारल्यामुळे लाभधारक आर्थिक संकटात सापडले आहेत. सिडकोने जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर येणाऱ्या काळात तीव्र पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा सिडको लाभार्थ्यांनी दिला आहे.
सांगली : संजय राऊत थोड्या वेळात मुंबईला रवाना होणार
कवलापूर विमानतळाच्या दिशेने संजय राऊत निघाले
हेलिकॉप्टरने संजय राऊत थोड्या वेळात मुंबईला रवाना होणार
वाशिम : वाशिमच्या मानोरा दिग्रस रस्त्यावर वापटा घाटात टेम्पोचा अपघात
वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले
दिग्रस तालुक्यातील कोलुरा येथून कारंजा कडे लग्नाचं वराड घेऊन जातांना घडला अपघात
या अपघातात 20 जण जखमी तर 5 जण गंभीर जखमी
जखमींना मानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर काहींना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आलं
जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाचे नाराज असलेले माजी आमदार संतोष चौधरी यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. संतोष चौधरी यांनी आजपर्यंत शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून काम केले आहे. यापुढे ही ते पवार साहेबांच्या लढ्यात त्यांना साथ देतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. जळगाव मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतली असून रावेर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न मिळाल्याने संतोष चौधरी हे बंडाच्या तयारीत असून राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. तर उद्या पक्षाध्यक्ष शरद पवार हे रावेर लोकसभेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यापूर्वीच जयंत पाटलांकडून रावेर लोकसभेतील नाराजी नाट्य दूर करण्याचा प्रयत्न केला दरम्यान पदाधिकाऱ्यांची घेण्यात आलेली बैठक ही आढावा बैठक असून श्रीराम पाटील हे रावेर लोकसभेतून विजयी होणार असल्याचा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला असून नाराज असलेले माजी आमदार संतोष चौधरी यांच्याशी चर्चा सुरू असल्याचेही जयंत पाटलांनी स्पष्ट केली आहे.
Sindhudurg News : मनसे नेते अविनाश जाधव कोकणच्या दौऱ्यावर असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंच्या बाजूने मनसे कार्यकर्ते राहतील. त्याचा प्रचार करतील असं म्हटलं.
बुलढाणा : खामगाव शहारा नजिक असलेल्या घाटपुरी येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटात दोन घरांना आग.
आगीत दोन्ही घर जळून खाक.
आगीत एका झोपल्यात झोपलेल एक चार माहिण्याच बाळ बालंबाल बचावल.
आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश.
अमरावती : काँग्रेसचे जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जयराम रमेश म्हणाले, 16 लाख करोड मोठ्या उद्योगांचं कर्ज माफ केले, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलं नाही, आम्ही कर्जमाफी करणार, ही आमची गॅरंटी आहे. 45 पेक्षा वयाचे युवक आजही बेरोजगार आहे. अनेक बेरोजगार आत्महत्या करत आहे. प्रत्येक डिप्लोमा युवकांना आम्ही नोकरी देणार, 30 लाख नोकऱ्या खाली पडून आहे, त्या आम्ही एका वर्षात नोकरी देणार, असंही म्हणाले. आम्ही जुमला नाही देणार आम्ही जे बोललो ते करणारच. आम्ही महालक्ष्मी योजना लागू करणार, पंतप्रधान भाषण दुनियाची करतात पण बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, लडाख मध्ये घुसखोरी वर नाही बोलत आहे. फक्त त्यांचा एकच नारा आहे 400 पार, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Akola News : अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात महाविकास आघाडीची सभा सुरू झाली आहे. काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेस महासचिव खासदार मुकूल वासनिक यांचं आगमन झालं आहे. मंचावर उमेदवार डॉ. अभय पाटील, आमदार नितीन देशमुख, काँग्रेस सचिव आशिष दुआ, काँग्रेसच्या आदिवासी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांची उपस्थिती आहे. तसेच मंचावर काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उपस्थित आहेत.
UP News : काँग्रेस आणि समाजवादी कॉंग्रेस पार्टीची आज उत्तर की प्रदेशमध्ये पहिली संयुक्त सभा होत आहे.अमरोहातील स्टेडियमवर आज दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे. अमरोहातून कॉंग्रेसचे दानिश अली निवडणूकीच्या मैदानात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 80 जागांपैकी 17 जागेवर कॉंग्रेस उमेदवार निवडणूक लढत आहेत.
रायगड : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅएआर अंतुले यांचे जावई आणि काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले हे येत्या 23 एप्रील रोजी सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँगेस पक्ष अजित पवार गटात जाहिर पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. मुश्ताक अंतुले हे सुनील तटकरे यांचे जवळचे मित्र आहेत तसेच ते त्यांनी काँग्रेस मध्ये महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पद देखील भूषविले आहे त्यामुळे अंतुले यांच्या अनेक सुखदुःखात तटकरे नेहमीचं पोहचत असतात. मात्र मुश्ताक अंतुले यांच्या अचानक या निर्णयाकडे सर्वांना आश्चर्यचकित करुन टाकणार आहे.
मुंबई : वातावरणात होणारे प्रचंड बदलाने मनुष्य हैराण झाले आहेत. अश्यात वृक्ष संवर्धनाचे संदेश जगात दिले जात आहेत. मात्र मुंबईत अनेक झाडांना विष देऊन त्यांची कत्तल केल्याचे समोर आले आहे.पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर परिसरात 41 झाडांवर विषप्रयोग करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. विषप्रयोग झाल्याच समोर येताच पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवर पंत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 फॉक्सटेल पाम, 16 पेल्टोफोरम, 2 सुभाबूळ आणि एक पिंपळाच्या झाड आणि इतर झाडे कापली तसेच त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याच समोर आले आहे. महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व जतन अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करीत आहे.जाहिरातींच्या होर्डिंगसाठी किंवा बांधकामात अडसर झाल्याने या झाडांची कत्तल झाल्याचा संशय आहे.
One Group in NCP is upset with Ajit Pawar Lok Sabha Election 2024Maharashtra Politics
Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला एक गट अजित पवार यांच्यावर नाराज
नाशिकसह परभणी, गडचिरोली, सातारा लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार असताना देखील शिवसेना आणि भाजपच्या दबावाला झुगारता न आल्यामुळे निवडून येणाऱ्या जागा हातातून गेल्याने नाराजीचा सूर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केवळ स्व पक्षातील दोन उमेदवार आणि इतर ठिकाणीं उमेदवार आयात केल्याने आणि निवडून येणारे मतदार संघ सोडून इतर मतदारसंघ घेतल्याने नाराजी
नाशिक लोकसभेचा निर्णय तीन आठवडे घ्यायला विलंब लावल्याने नाराजीत आणखी भर
केंद्रीय पातळीवरून उमेदवारी जाहीर होऊन देखील राज्यातील नेत्यांच्या दबावाला झूगारता न आल्यामुळे नाशिकची निवडून येऊ शकेल अशी जागा गमावल्याची सूत्रांची माहिती
पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यातून लोकसभेला घड्याळ चिन्ह हद्दपार
Dhule Lok Sabha Election 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील नाराजी नाट्य समोर आले एकीकडे काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे मेळावे होत असताना त्यात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याने ते या मेळाव्यांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे पक्षाचे नेतृत्वावर आपला विश्वास असून आपली उमेदवारी निश्चित जाहीर होईल असा विश्वास काँग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी व्यक्त केली आहे.
नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन दिग्गज नेत्यांनी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी सभा घेतात ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हे दोन दिग्गज नेते एकाच मतदारसंघांसाठी आले असे माझ्या ऐकण्यात नाही पण नांदेडमध्ये घडलं, अशी प्रतिक्रिया नांदेडचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांनी दिली आहे.
माझगाव : महानगर दंडाधिकारी न्यायालयात आरोपीचा धिंगाणा...
न्यायालयाने आरोपी मोहम्मद गौस पीर मौहम्मद याला पोलिस कस्टडी सुनावल्यानंतर त्याला कारागृहात नेहले जात होते
आरोपी मोहम्मद गौस पीर मौहम्मद याला नेत असताना त्याने पोलिसांशी त्याने हुज्जत घातली
न्यायालय परिसरात मोठ मोठ्याने पोलिस आणि न्यायालयाला शिवीगाळ केली
पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, अचानक आरोपीने तोंडातून ब्लेड बाहेर काढत पोलिस पथकाला धमकावू लागला
त्यानंतर त्याने स्वत:लाच इजा करून घेतल्याचा प्रकार गुरूवारी माझगाव दंडाधिकारी न्यायालयात घडला आला आहे
नाशिक : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेता अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकांकडून हॉटेल्स तसेच व्यावसायिकांची सध्या तपासणी केली जात असून त्र्यंबकेश्वरमध्ये महादेव मंदिराबाहेर कलाकंद तसेच बर्फीच्या नावाखाली विकला जाणारा भेसळयुक्त मावा सदृश्य अन्न पदार्थ अन्न औषध प्रशासनाने जप्त करत प्रसाद विक्रेत्यांना दणका दिलाय. मे. भोलेनाथ स्विट्समधून ३७ हजार ४४० रुपयांचा ७८ किलो कुंदा आणि श्री नित्यानंद पेढा सेंटरमधून सहा हजार ६०० रुपयांचा २२ किलोचा माल असा एकूण ५४ हजार ४४० रुपयांचा भेसळयुक्त प्रसाद जप्त करण्यात येऊन तो घंटागाडीमध्ये टाकून नष्ट करण्यात आलाय. तपासणीसाठी या अन्न पदार्थांचे नुमने अन्न विश्लेषकास पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच पुढील करवाई केली जाणार आहे.
नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी नांदेडमध्ये जय्यत तयारी
एक लाख लोकांची बैठक व्यवस्था, हजारो पोलिसांचा फौजफाटा नांदेडमध्ये तैनात
भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारर्थ आज मोदींची सभा
सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान मोदींचे नांदेड येथे होणार आगमन
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या मध्यप्रदेशच्या सीमेवर पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत ४ देशी पिस्टल व सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी मध्यप्रदेशातील चौघाना अटक आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. सोनाळा पोलिसांनी वसाडी ते हाडियामल या गवादरम्यान ही कारवाई केली. सापळा रचून केलेल्या या कारवाईत पिस्टलचा सौदा करण्याच्या बेतात असलेल्या चोघांची झडती घेण्यात आली. त्यांच्या जवळून ४ पिस्टल, मॅगझीन सह १७ जिवंत काडतुसे, दुचाकी वाहन, मोबाईल असा २ लाख १७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या चोघांची कसून चौकशी करण्यात आले आहे. ते मध्यप्रदेश चे रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. भारसिंग मिसऱ्या खिराडेव, हिरचंद गुमानदेव उचवार ( दोन्ही राहणार पाचोरी तहसिल खकणार जिल्हा बऱ्हाणपूर), आकाश मुरलीधर मेश्राम, ( करूनासागर , बालाघाट) संदीप डोंगरे ( आमगाव बालाघाट) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरुद्ध शस्त्र कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड : कुत्र्याच्या पिल्लाला लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड लिंक रस्त्यावरील एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी मधील गुप्ता ट्रेडर्स या दुकानासमोर घडली. गुप्ता असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हितेश कुंदनानी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Kolhapur News : छत्रपती कुटुंबाने राजर्षी राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम केलं नाही. ते काम जनक घराणे म्हणून विक्रमसिंह घाटगे आणि समरजित घाटगे यांनी केलं, असं वक्तव्य खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी केलं आहे. कागलमधील भाजप पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने एक ही उद्योग छत्रपती कुटुंब काढू शकलं नाही. 12 ते 15 वर्ष बंद पडलेली शाहू मील देखील त्यांना सुरू करता आलेली नाही, असं म्हणत वीरेंद्र मंडलिक यांनी छत्रपती कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. राजर्षी शाहू महाराजांचे खरे जनक वारसदार समरजित घाटगे तुम्हीच आहात, असंही वीरेंद्र मंडलिक यांनी म्हटलं आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -