Sanjay Raut : सध्या राज्यात आणि देशात भोंग्याचे राजकारण चांगलाच तापलं आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत रामनवमी आणि हनुमान जयंतीला घडलेल्या हिंसक घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न केले आहेत. आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवांवर ती कधी तणावाचं वातावरण नव्हतं, कधी त्या क्षेत्रांवर हल्ले झाले नव्हते, पण या वेळेला या देशातल्या काही शक्तीने ठरवून हे हल्ले घडवून आणण्यासाठी फार मोठे षडयंत्र रचलं. पंतप्रधान यावर गप्प का? असे म्हणाले. तसेच राज्यात घडत असलेल्या राजकारणावर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. या राज्यातील वातावरण तणावाचं करण्याचं षड्यंत्र देखील रचलं होतं, परंतु महाराष्ट्राच्या जनतेने हा माहोल उधळून लावला आहे. काही लोक या दोन्ही दैवतांचा वापर राजकीय मुद्यांसाठी करत आहेत


पंतप्रधान मोदी गप्प का?


देशातील निवडणुकांतील देशातील वातावरण ठरवून बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. रामनवमी तसेच हनुमान जयंतीला या आधी हल्ला झाला नाही, मग यावर्षीच का हल्ले होत आहेत? आणि यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? पंतप्रधानांनी सांप्रदायिक एकतेबाबत बोललं पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. दंगे भडकवणं हे नव हिंदुत्ववादी ओवेसींचं लक्ष्य असल्याचा आरोपही त्यांनी विरोधकांवर केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री बिगर-भाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचे राऊत म्हणाले


भगवान रामही आज अस्वस्थ असतील


महाराष्ट्रातल्या ओवेसी कोण आहेत हे हजार भोंग्यावरून स्पष्ट झाले आहेत. या विषयावर ती सरकार सोबत चर्चा होऊ शकत होती. सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत, त्याच्यावर काही कार्यवाही सुरू आहेत, असं असताना फक्त या राज्यांमध्ये अशांतता आणि अस्थिरता निर्माण करून भारतीय जनता पक्षाच्या मनातली राष्ट्रपती राजवट निर्माण करणारी स्थिती निर्माण करणे यासाठी हे भोंग्याचे राजकारण झालं होतं पण काल कोल्हापूरचं झालेलं मतदान आणि लोकांनी ठेवलेला संयम यामुळे हे वातावरण बदललं आहे. डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे हे त्यांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी जीवित नाही त्यामुळे अशा व्यक्ती ज्या जीवित नाही त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही. श्रीरामाच्या नावाने जातीय वणवा पेटवणे हा प्रभू रामाचा अपमान आहे, असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मध्य प्रदेशातील खरगोन येथील घडामोडींमुळे भगवान रामही अस्वस्थ असतील, असे सांगितले. रामनवमीमुळे संचारबंदी लागू करण्यात आली. अत्यंत खेदजनक बाब आहे.


शरद पवार आणि मुख्यमंत्री एकत्रित मुंबईत या संदर्भात कॉन्फरन्स


बिगर भाजपा शासित राज्याचे मुख्यमंत्री आहेत, विशेष करून ममता या सर्वांना शरद पवार आणि मुख्यमंत्री यांनी एकत्र करून मुंबईत या संदर्भात एक कॉन्फरन्स घेणार आहोत त्यासंदर्भात तयारी सुरू झालेली आहे. तिथे लंका आहे तिथे जा, जरा अभ्यास करा आपल्या शेजारच्या राष्ट्रात काय चाललंय? श्रीलंकेत याआधी सोन्याच्या विटा होत्या, आता त्या ठिकाणी महागाई आणि बेरोजगारी या दोन प्रश्न आहेत आणि आता या देशात देखील असेच प्रश्न आहेत, त्यामुळे भाजप स्वतः यात लंकेला आग लावतील


100 कोटीचा हिशेब आम्ही देऊ, साडेतीन कोटींचा हिशेब त्यांनी द्यावा


आयएनएस विक्रांत घोटाळ्यात किरीट सोमय्या आरोपी आहेत. 100 कोटीचा हिशेब आम्ही देऊ, साडेतीन कोटींचा हिशेब त्यांनी द्यावा, सोमय्या हे जामिनावर सुटलेले आरोपी असल्याचे राऊत म्हणाले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: