मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत पहिला निकाल नंदुरबारमधून लागला आहे. नंदूरबारमध्ये काँग्रेस उमदेवार गोवाल पाडवी यांनी विजय मिळवला. गोवाल पाडवी यांनी भाजप खासदार हिना गावित यांचा पराभव केला. दरम्यान अंतिम निकाल आता हाती आला असून राज्यात महाविकास आघाडीने 29 जागांवर विजय मिळवला. तर महायुती 19 जागांवर थांबली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक असल्याने त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.

राज्यात महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक 21 जागा या शिवसेना ठाकरे गटाने लढल्या. तर त्यानंतर काँग्रेसने 17 जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 जागा लढवल्या. तर दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वाधिक 23 जागा या भाजपने लढवल्या, तर शिंदे गटाने 15 आणि अजित पवारांनी चार जागा जिंकल्या.

48 मतदारसंघातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी (Maharashtra Lok Sabha Election Result)

  लोकसभा मतदारसंघ विजयी उमेदवार महायुती
(भाजप, शिंदे आणि अजित)
महाविकास आघाडी
(उबाठा, शरद पवार, काँग्रेस)
वंचित
1 नंदुरबार गोवाल पाडवी डॉ. हिना गावित गोवाल पाडवी  
2 धुळे शोभा बच्छाव सुभाष भामरे शोभा बच्छाव अब्दुल रहमान
3 जळगाव स्मिता वाघ स्मिता वाघ करण पवार  
4 रावेर रक्षा खडसे रक्षा खडसे रवींद्र पाटील संजय ब्राम्हणे
5 बुलडाणा प्रतापराव जाधव प्रतापराव जाधव नरेंद्र खेडेकर  
6 अकोला अनुप धोत्रे अनुप धोत्रे अभय पाटील  
7 अमरावती बळवंत वानखेडे नवनीत राणा बळवंत वानखेडे  
8 वर्धा अमर काळे रामदास तडस अमर काळे  
9 रामटेक श्यामकुमार बर्वे राजू पारवे  श्यामकुमार बर्वे  
10 नागपूर नितीन गडकरी नितीन गडकरी विकास ठाकरे  
11 भंडारा-गोंदिया डॉ. प्रशांत पडोळे सुनील मेंढे डॉ. प्रशांत पडोळे  
12 गडचिरोली-चिमूर डॉ. नामदेव किरसान अशोक नेते
डॉ. नामदेव किरसान
 
13 चंद्रपूर प्रतिभा धानोरकर सुधीर मुनगंटीवार प्रतिभा धानोरकर  
14 यवतमाळ - वाशिम डॉ. प्रशांत पडोळे राजश्री पाटील संजय देशमुख  
15 हिंगोली नागेश पाटील आष्टीकर बाबूराव कदम नागेश पाटील आष्टीकर डॉ. बी.डी. चव्हाण
16 नांदेड वसंतराव बळवंतराव चव्हाण प्रताप पाटील चिखलीकर
वसंतराव बळवंतराव चव्हाण
 
17 परभणी संजय जाधव महादेव जानकर संजय जाधव  
18 जालना कल्याणराव काळे रावसाहेब दानवे कल्याणराव काळे प्रभाकर बखले
19 औरंगाबाद संदीपान भुमरे संदीपान भुमरे चंद्रकांत खैरे इम्तियाज जलील
20 दिंडोरी भास्करराव भगरे डॉ. भारती पवार भास्करराव भगरे  
21 नाशिक राजाभाई वाजे हेमंत गोडसे राजाभाई वाजे  
22 पालघर हेमंत सावरा हेमंत सावरा भारती कामडी  
23 भिवंडी सुरेश म्हात्रे कपिल पाटील सुरेश म्हात्रे  
24 कल्याण श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे वैशाली दरेकर  
25 ठाणे नरेश मस्के नरेश म्हस्के राजन विचारे  
26 मुंबई-उत्तर पियुष गोयल पियुष गोयल
काँग्रेस -उमेदवार घोषणा नाही
 
27 मुंबई - उत्तर पश्चिम रवींद्र वायकर रविंद्र वायकर अमोल कीर्तीकर  
28
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व)
संजय दिना पाटील मिहीर कोटेचा संजय दिना पाटील  
29 मुंबई उत्तर मध्य वर्षा गायकवाड उज्ज्वल निकम वर्षा गायकवाड अबुल हसन खान
30 मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई राहुल शेवाळे अनिल देसाई  
31 दक्षिण मुंबई अरविंद सावंत यामिनी जाधव अरविंद सावंत  
32 रायगड सुनील तटकरे सुनील तटकरे अनंत गीते  
33 मावळ श्रीरंग बारणे श्रीरंग बारणे संजोग वाघेरे-पाटील  
34 पुणे मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ रविंद्र धंगेकर  
35 बारामती सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे  
36 शिरुर डॉ. अमोल कोल्हे शिवाजी आढळराव डॉ. अमोल कोल्हे  
37 अहमदनगर निलेश लंके सुजय विखे पाटील निलेश लंके  
38 शिर्डी भाऊसाहेब वाघचौरे सदााशिव लोखंडे भाऊसाहेब वाघचौरे  
39 बीड बजरंग सोनवणे पंकजा मुंडे बजरंग सोनवणे  
40 धाराशिव ओमराजे निंबाळकर अर्चना पाटील
ओमराजे निंबाळकर
 
41 लातूर शिवाजीराव काळगे सुधाकर श्रृंगारे शिवाजीराव काळगे नरिसिंह उदगीरकर
42 सोलापूर प्रणिती शिंदे राम सातपुते प्रणिती शिंदे
राहुल काशिनाथ गायकवाड
43 माढा धैर्यशील मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील रमेश बारसकर
44 सांगली विशाल पाटील संजयकाका पाटील चंद्रहार पाटील विशाल पाटील
45 सातारा उदयनराजे भोसले उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे मारुती जानकर
46 रत्नागिरी-सिंधुदुर्ग नारायण राणे नारायण राणे विनायक राऊत काका जोशी
47 कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती संजय मंडलिक
शाहू महाराज छत्रपती
 
48 हातकणंगले धैर्यशील माने धैर्यशील माने सत्यजीत पाटील
दादागौडा चवगोंडा पाटील