Gujarat Lok Sabha Election Results 2024 : गुजरातमध्ये लोकसभेच्या २६ जागा असून यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये थेट लढत झाली. 26 पैकी 25 जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी मतदान पार पडले होते. तर सुरतच्या जागेवर भाजपचे मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत. गुजरातमधील 25 जागांवर तिसऱ्या टप्यात एकूण 56.91 टक्के मतदान झाले. ही मतदानाची टक्केवारी 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत 4.6 टक्क्यांनी कमी झाली आहे.
गुजरात राज्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य आहे. त्यामुळे गुजरातच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गांधीनगर मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.तर भरूच आणि भावनगरमधून आम आदमी पक्षासोबत काँग्रेसने आघाडी केलेली आहे. 2019 च्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 26 जागा भाजपाने जिंकल्या होत्या. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. यंदाच्या निवडणुकीत काय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गुजरातमध्ये 25 जागांपैकी 23 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर दोन जागांवर काँग्रेसची आघाडी आहे.
क्रमांक | उमेदवाराचे नाव आणि पक्ष | मतदार संघ | आघाडीवर असलेले उमेदवार |
1 |
हिम्मत सिंह पटेल - काँग्रेस हसमुखभाई सोमाभाई पटेल - भाजप |
अहमदाबाद पूर्व गुजरात | हसमुखभाई सोमाभाई पटेल - भाजप |
2 |
भरत मकवाना - काँग्रेस दिनेशभाई कोदरभाई मकवाना - भाजप |
अहमदाबाद पश्चिम | दिनेशभाई कोदरभाई मकवाना - भाजप |
3 |
जेनी ठुमर अमरेली - काँग्रेस भरत मनुभाई सुतारिया - भाजप |
अमरेली | भरत मनुभाई सुतारिया - भाजप |
4 |
अमित चवडा - काँग्रेस मितेशभाई रमेशभाई पटेल - भाजप |
आनंद | मितेशभाई रमेशभाई पटेल - भाजप |
5 |
डॉ. रेखाबेन हितेशभाई चौधरी - भाजप गेनीबेन ठाकोर बनासकांठा- काँग्रेस |
बनासकांठा | डॉ. रेखाबेन हितेशभाई चौधरी - भाजप |
6 |
सिद्धार्थ चौधरी - काँग्रेस प्रभुभाई नागरभाई वसावा - भाजप |
बारडोली | प्रभुभाई नागरभाई वसावा - भाजप |
7 |
मनसुखभाई वसावा - भाजप चैतरभाई दामजीभाई - आप |
भरुच | मनसुखभाई वसावा - भाजप |
8 |
उमेशभाई नारणभाई मकवाना - आप निमुबेन बांभनिया - भाजप |
भावनगर | निमुबेन बांभनिया - भाजप |
9 |
जशुभाई भिलुभाई राठवा - भाजप सुखराम राठवा - काँग्रेस |
छोटा उदयपूर | जशुभाई भिलुभाई राठवा - भाजप |
10 |
प्रभाबेन तवियाद - काँग्रेस जसवंतसिंह भाभोर - भाजप |
दाहोद | मनसुखभाई वसावा - भाजप |
11 |
अमित शाह - भाजप सोनल पटेल - काँग्रेस |
गांधीनगर | अमित शाह - भाजप |
12 |
जेपी मराविया - काँग्रेस पूनमबेन मॅडम - भाजप |
जामनगर | पूनमबेन मॅडम - भाजप |
13 |
राजेशभाई चुडासामा - भाजप जोतवा हिराभाई अर्जनभाई - काँग्रेस |
जुनागड | राजेशभाई चुडासामा - भाजप |
14 |
विनोदभाऊ लखमाशी चवडा - भाजप नितीशभाई लालन - काँग्रेस |
कच्छ | विनोदभाऊ लखमाशी चवडा - भाजप |
15 |
देवुसिंह चौहान - भाजप काळुसिंह दाभी - काँग्रेस |
खेडा | देवुसिंह चौहान - भाजप |
16 |
रामजी ठाकोर (पालवी) - काँग्रेस हरिभाई पटेल - भाजप |
महेसाणा | हरिभाई पटेल - भाजप |
17 |
सीआर पाटील - भाजप नैशाध देसाई - काँग्रेस |
नवसारी | सीआर पाटील - भाजप |
18 |
राजपालसिंह महेंद्रसिंह जाधव - भाजप गुलाबसिंह चौहान - काँग्रेस |
पंचमहाल | राजपालसिंह महेंद्रसिंह जाधव - भाजप |
19 |
चंदनजी ठाकोर - काँग्रेस भरतसिंगजी दाभी - भाजप |
पाटण | चंदनजी ठाकोर - काँग्रेस |
20 |
ललितभाई वसोया - काँग्रेस मनसुखभाई मांडविया - भाजप |
पोरबंदर | मनसुखभाई मांडविया - भाजप |
21 |
परशोत्तम रुपाला - भाजप परेशभाई धनानी - काँग्रेस |
राजकोट | परशोत्तम रुपाला - भाजप |
22 |
शोभाबेन महेंद्रसिंह ब्रारिया - भाजप डॉ. तुषार चौधरी - काँग्रेस |
साबरकांठा | डॉ. तुषार चौधरी - काँग्रेस |
23 |
निलेश कुंभानी गुजरात - काँग्रेस मुकेशभाई चंद्रकांत दलाल - भाजप |
सुरत | मुकेशभाई चंद्रकांत दलाल (बिनविरोध विजयी) |
24 |
चंदूभाई छगनभाई शिहोरा - भाजप रुत्विकभाई लवजीभाई मकवाना - काँग्रेस |
सुरेंद्रनगर | चंदूभाई छगनभाई शिहोरा - भाजप |
25 |
पदियार जशपालसिंह महेंद्रसिंह (बापू) - काँग्रेस हेमांग योगेशचंद्र जोशी - भाजप |
वडोदरा | हेमांग योगेशचंद्र जोशी - भाजप |
26 |
धवल पटेल - भाजप अनंतभाई पटेल - काँग्रेस |
वलसाड | धवल पटेल - भाजप |