मुंबई : चोरीचपाटीने वायकरांचा विजय झाला आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये, रवींद्र वायकर (Ravindra Waikar) डरपोक आहेत. ईडी सीबीआयला घाबरून पळाले अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केली आहे. तसेच बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांनी वर्धापनदिन साजरा करू नये असे देखील वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 58 वर्षांपूर्वी शिवसेनेचा पाया घातला. 58 वर्षांपासून बाळासाहेबांची शिवसेना मुंबई,महाराष्ट्र,दिल्लीत काम करत आहे. आम्ही तेव्हापासून त्यांच्या विचारांनी भारावलेल्या सर्व तरुणांनी भगवा झेंडा आमच्या खांद्यावर घेतला. आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो. आमच्या अनेक जुन्या सहकाऱ्यांनी या पक्षासाठी बलिदान दिलं. आम्ही सर्वांनी तुरुंगवास भोगला पण आम्ही आमच्या पक्षाशी इमान कायम ठेवला. आता जर कोणी म्हणत असेल ते शिंदे गट आमची शिवसेना खरी तर त्यांनी स्वतःला आरशात पाहावे. बाळासाहेबांचे शिवसेना जेव्हा स्थापन झाली तेव्हा ते कुठे होते, कुठल्या गोधडीत रांगत होते. उद्या डोम नावाच्या सभागृहात कुठेतरी हे दोन कावळे जमणार आहेत.
लांडग्याने वाघाचं कातड पांघरलं तर तो वाघ होत नाही: संजय राऊत
पैशाने मत विकत घेणं वायकरांच्या विजयाची चोरी करणे याला जनाधार म्हणत नाहीत. आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांशी चरणाशी ठेवणं याला जनाधार आणि विचारधारा म्हणत नाही. लांडग्याने वाघाचं कातड पांघरलं तर तो वाघ होत नाही. हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचा नेतृत्व करत आहेत .जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत त्यांची ही कारस्थान आहेत, असे राऊत म्हणाले.
शिंदेंचे जे काही प्रकरण आहे ते काही दिवसांतच बंद होईल : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, शिवसेना अशा प्रकारे फोडण हे महाराष्ट्रावरचं सर्वात मोठे आक्रमण आहे. मोघलांनंतर सर्वात मोठं आक्रमण मोदी शहा यांनी केलं आहे. राज्यात पैशाच्या ताकदीवर पाच सहा जागा जिंकल्या म्हणजे विचारधारा आणि शिवसेना त्यांचे होत नाही . आम्ही कोणाविषयी नकली शब्द करत नाही. असंख्य काँग्रेस पक्ष स्थापन झाले मूळ काँग्रेस पक्ष आजही आहे आणि तोच सर्वात मोठा पक्ष आहे. शिंदेंचे जे काही प्रकरण आहे ते काही दिवसांतच बंद होईल.
Video :
हे ही वाचा :