मुंबई: मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा (Mumbai North West Loksabha) मतदारसंघातील निकालावरून वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते, खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी रवींद्र वायकर यांनी माध्यमांशी संवाद साधत मतमोजणीदरम्यान एक लाख मतांची मोजणी बाकी असताना विजय कुणी घोषित केलं?, असा सवाल उपस्थित केला.


राज ठाकरेंच्या भेटीनंतर रवींद्र वायकर काय म्हणाले?


राज ठाकरेंसोबतची भेट ही सदिच्छा भेट होती. राज ठाकरेंचे सहकार्य लाभलं, त्याबाबत भेट घेणं महत्वाचं होतं, असं रवींद्र वायकर यांनी सांगितले. तसेच अनेकजणांकडे मोहाईल होते, तुम्हाला याची माहिती मिळेल असं म्हणत लोकशाही आहे, कोणीही न्यायालयात दाद मागू शकतो, असं रवींद्र वायकरांनी सांगितले. मी मतमोजणीच्या केंद्रात गेलो, तेव्हा अजून निकाल दिला नाहीय, तुम्ही बसा..असं मला सांगण्यात आलं. विरोधकांकडून ईव्हीएम हँक केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. पण ईव्हीएम हँक केलं असेल तर ते 1 मतांनी पुढे होते आणि मी 1 मतांनी मागे होतो. नंतर बॅलेट मतमोजणीचा आकडा सांगितला, तेव्हा मी आघाडी घेतली, असं रवींद्र वायकर म्हणाले. तसेच मी वर्कोहोलिक आहे, त्यांच्यासारखं अल्कहोलिक नाही, असा टोलाही रवींद्र वायकरांनी लगावला.


इनकोर आॅपरेटर दिनेश गुरव यांच्या अडचणीत होणार वाढ-


उत्तर पश्चिम मतदार केंद्रावर मतदान केंद्रात मोबाइल देणारे इनकोर आॅपरेटर दिनेश गुरव यांच्या अडचणीत होणार वाढ होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार एनकोर आॅपरेटर यांची यादी पोलिसांना देण्यात आली होती. या यादित दिनेश गुरव यांचंही नाव होतं, तसेच त्यांच्याजवळील मोबाइल हा केवळ ETPBMS  व Encore साठीचा OTP पूरताच मोबाइल स्वत: जवळ ठेवण्याच्या सूचना होत्या. मात्र अन्य वेळी मोबाइल हे सायलेन्ट करून निवडणूक निरीक्षक / निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे ठेवण्याच्या सूचना असताना दिनेश गुरव हे वापरत असलेला मोबाइल त्यांनी बेकायदेशीर रित्या मंगेश पंडिलकर यांना वापरण्यात दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी वनराई पोलिसांनी अधिक तपास करत आहेत.


निवडणूक अधिकाऱ्यावर संजय राऊत यांचा आरोप 


मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करणाऱ्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यावरही राऊत यांनी मोठा आरोप केला आहे. सूर्यवंशी यांचा वायकर यांना विजयी करण्यामध्ये मोठा हात आहे. Evm मशीन  हॅक होऊ शकते असे अब्जाधीश एलॉन मस्क सांगत आहेत.निवडणूक अधिकाऱ्याचा पूर्वेतिहास जाणून घ्यावा. वंदना सूर्यवंशी यांचा मोबाइल सुद्धा जप्त करावा, अशी मागणी राऊत यांनी केली.


4 जूनला नेमकं काय घडलं?


मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांचा पराभव केला. याआधी अमोल कीर्तिकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली.  आता कीर्तिकर यांच्या आक्षेपानंतर बाद करण्यात आलेल्या 111 पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी 26 फेऱ्या आणि बाद करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आल्यानंतर रविंद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी झाल्याची घोषणा केली. अमोल किर्तीकरांच्या निसटत्या पराभवानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.