Maharashtra Budget session 2022: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव चर्चेविना संमत झाल्याने विरोधी पक्षाने सभागृहात गदारोळ केला आहे. हा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात अनुपस्थित राहिल्यानेही विरोधक आक्रमक झाले होते. अशातच आता विधानसभेच्या कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हे सरकार मुंबईच्या विकासकांना सुट देतय, दारू विक्री करणाऱ्यांना सुट देत आहे. मात्र शेतकऱ्यांना का वीज बिलातून सूट देत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.   


उपमुख्यमंत्र्याच्या शब्दाला किंमत नाही


सोलापूर जिल्ह्यातील सूरज या शेतकऱ्याने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. ही गंभीर बाब आम्ही सभागृहात उपस्थित केली. संवेदनशीलता दाखवत सरकारने वीज कापनी बंद करावी, अशी मागणी फडणवीसांनी राज्य सरकारला केली आहे. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ''शेतकरी आमचं वीज कनेक्शन कापू नका, असे सांगूनही वीज कापली जात आहे. उपमुख्यमंत्र्यानी सभागृहात दोनदा आश्वासन देऊनही वीज कापली जात आहे. उपमुख्यमंत्र्याच्या शब्दाला उर्जामंत्री किंमत देत नाही.'' वीज बिलाच्या मुद्द्यावर बोलताना ते पुढे म्हणाले, आज शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. महाविकास आघाडीतील अनेक आमदारही हाच प्रश्न मांडत असताना सरकारकडून त्यांची मुस्कट दाबी करण्यात आली.


फडणवीस म्हणाले आहेत की, ''हे शेतकरी विरोधी सरकार आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांवर वीज बिल न भरल्याने होणारी कारवाई थांबत नाही. तसेच शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पुन्हा जोडले जात नाही, तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू, असं ते म्हणाले, तसेच फडणवीस यांनी शेतकऱ्यांना खचून जाऊन आत्महत्या करू नका, असे आवाहन देखील केले आहे.        


संबंधित बातम्या: 


Maharashtra Budget Session : अधिवेशनाचा दुसरा आठवडा; आज ओबीसी आरक्षणासाठी विधेयक मांडणार, 'हे' मु्द्देही गाजणार


Maharashtra Budget Session LIVE: अधिवेशनाचा दुसरा आठवडा; नवाब मलिक, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजणार