Maharashtra Budget Session LIVE: अधिवेशनाचा दुसरा आठवडा; नवाब मलिक, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजणार

Maharashtra Budget Session 2022 :  राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. दिवस. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रत्येक घडामोडी एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Mar 2022 06:48 AM
विरोधकांच्या गोंधळात राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव चर्चेविना संमत

विरोधकांच्या गोंधळात राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव चर्चेविना संमत

OBC Reservation : सुधारणा विधेयक विधान परिषदेत एकमताने मंजूर

OBC Reservation : सुधारणा विधेयक विधान परिषदेत एकमताने मंजूर

मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र नगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधरणा विधेयक सभागृहात एकमताने मंजूर

निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा राज्य सरकारला सल्लामसलत करूनच निर्णय घेईल अशी सुधारणा विधेयकात करण्यात आली

सुधारणा विधेयक आमदार सुनील प्रभू यांनी मांडले

मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र नगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधरणा विधेयक सभागृहात एकमताने मंजूर

Maharashtra Budget Session LIVE: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलायला दुपारी 2.30 वाजता विधानसभेत येणार

 Maharashtra Budget Session LIVE:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलायला दुपारी 2.30 वाजता विधानसभेत येणार

विरोधकांच्या घोषणाबाजी नंतर विघानसभा 10 मिनिटे स्थगित

विरोधकांच्या घोषणाबाजी नंतर विघानसभा 10 मिनिटे स्थगित

राज्य शासकीय सेवेत बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे 258 उमेदवारांनी बनावट कागदपत्रे व निकाल करून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल प्राप्त केले- अदिती तटकरे

राज्य शासकीय सेवेत बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे 258 उमेदवारांनी बनावट कागदपत्रे व निकाल करून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल प्राप्त केले आहेत. यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या उमेदवारापैकी 34 उमेदवारांची शासनाच्या विविध विभागात नियुक्त्या झाल्या आहेत. आत्तापर्यंत 12 उमेदवारांच्या नियुक्त्या समाप्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित उमेदवारांवर देखील कडक करवाई होईल- अदिती तटकरे

आदिवासींच्या आंदोलनावर केसी पाडवी यांची प्रतिक्रिया

आदिवासींच्या आंदोलनावर केसी पाडवी यांची प्रतिक्रिया

वन दाव्याचा त्यांचा प्रश्न आहे, मी 9 फेब्रुवारीला बैठक घेतली, प्रकल्प मार्गी लागत नाही, जयंत पाटील यांच्याकडे बसून मिटींग केली, जयंत पाटील यांनाही विनंती केली की जमिनीमोबदल्यात जमीत देण्यात यावी, 

आमच्या खात्यातून 8 कोटी गेले, मी प्रत्यक्ष जाऊन आलो, 16 फेब्रुवारीला कलेक्टरकडे मिटींग होती, संपूर्ण प्रश्न सुटले पण वन दाव्याचा प्रश्न सुटला नाही…

- धडक मोर्चा आला हे मलाच माहीत नव्हतं… हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अख्यत्यारीत आहे… आंदोलनाची भूमिका असते… 

- मला त्यांनी अभ्यास करण्याची संधी दिली नाही, मी विनंती केलीये की मुख्यमंत्र्यांशी संध्याकाळपर्यंत बोलेन, तोडगा काढेन… 

यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांची सुद्धा वेळ मागितली आहे आम्ही एकत्र मिळून बैठक घेऊ आणि त्यांची काय मागणी आहे त्यावर विचार करू

- विरोधकांचा हात आहे की नाही हे माहीत नाही, असं होऊ नये, पण त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार…

मंत्रालयासमोर आदिवासींच्या मागण्यासाठी धरणे आंदोलन

आज सकाळी आदिवासींच्या मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चानं मंत्रालयासमोर आंदोलन केले आहे

आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर हे आंदोलन करण्यात आला

400 ते 500 आदिवासी बुलढाणा नंदुरबार नाशिक जळगाव या जिल्ह्यातून मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करायला बसले आहे

वन हक्क अधिकार कायदाची अंमलबजावणी व आदिवासीना त्यांचा अधिकार मिळावा 

वनविभागाकडून आदिवासींना देण्यात येणारा त्रास कमी व्हावा या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले

जोपर्यंत आदिवासी विकास मंत्री मुख्यमंत्री यात लक्ष घालून भेट देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन आपल्या आंदोलनावर ठाम आहेत
मुंबई-गोवा महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देणारा हा प्रकल्प, 2023 ला मुंबई-गोवा प्रकल्प पूर्णत्वास- अशोक चव्हाण

मुंबई- गोवा मार्गावर लक्षवेधी; अशोक चव्हाण म्हणाले, भूसंपादन करण्यात महाराष्ट्रात दर सर्वाधिक असल्याचे केंद्राचे मत आहे. याबाबत नितीन गडकरी यांच्याशी बैठक घेण्यात आली आहे, 471 किमी ऐवजी  277किमी काम पूर्ण झाले आहे.. 161 किमी काम उर्वरित आहे. साधारण मुंबई गोवा मार्गाचे 61% काम पूर्ण झाले आहे..  प्रकल्प रेंगाळलेला आहे हे आम्ही केंद्राला सांगत आहोत.. महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देणारा हा प्रकल्प आहे...2023 ला मुंबई गोवा प्रकल्प पूर्णत्वास येईल

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक गोपनीय पद्धतीनं व्हावी या मागणीसाठी भाजपाकडून हायकोर्टात याचिका दाखल

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक गोपनीय पद्धतीनं व्हावी या मागणीसाठी भाजपानं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 

कोर्टाने  दहा लाख रूपये आधी जमा करावे म्हटले होते त्यानुसार दहा लाख रूपये कोर्टात जमा केले.  

गिरीश महाजन यांनी कोर्टात दहा लाखाचा  डीडी दिल्याची माहिती, उद्या सुनावणी

प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकार स्वतःकडे घेणारे विधेयक आज मांडण्यात येणार,  मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार कायदा आणणार, सर्वपक्षीय बैठकीत निर्णय 

प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकार स्वतःकडे घेणारे विधेयक आज मांडण्यात येणार, सर्वपक्षीय बैठकीत निर्णय, मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार कायदा आणणार, विधानसभा आणि विधान परिषदेत विधेयक मांडणार

विधानमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचं आंदोलन, नवाब मलिक यांचा राजीनामा आणि ओबीसी आरक्षणावरुन विरोधक आक्रमक

विधानमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचं आंदोलन, नवाब मलिक यांचा राजीनामा आणि ओबीसी आरक्षणावरुन विरोधक आक्रमक

ओबीसी आरक्षण मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी थोड्याच वेळात प्रमुख पक्षातील नेत्यांची बैठक

ओबीसी आरक्षण मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी थोड्याच वेळात प्रमुख पक्षातील नेत्यांची बैठक

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आजच्या कामकाजाबाबत चर्चा होणार

भाजपकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार उपस्थित राहणार

अधिवेशनाचा दुसरा आठवडा; नवाब मलिक, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजणार

अधिवेशनाचा दुसरा आठवडा; नवाब मलिक, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजणार

 OBC Reservation : थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक, बैठकीत ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर संदर्भात घेणार मोठा निर्णय

 OBC Reservation : थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक, बैठकीत ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर संदर्भात घेणार मोठा निर्णय

निवडणूक तारीख संदर्भात मध्य प्रदेश सरकारच्या कायद्यासंदर्भात होणार निर्णय

निवडणूक आणि प्रभाग ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारकडे घेणार

मंत्रीमंडळ बैठकीत होणार निर्णय

 Maharashtra Budget Session Vidhan Sabha LIVE:  विधानसभा कामकाज पूर्ण दिवसासाठी स्थगित, सोमवारी कामकाज होणार

Maharashtra Budget Session Vidhan Sabha LIVE:  विधानसभा कामकाज पूर्ण दिवसासाठी स्थगित, सोमवारी कामकाज होणार

- अधिवेशनासंबंधी सर्व अपडेट्स एका क्लिकवर 

#Maharashtra #BudgetSession 

https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-budget-session-live-updates-state-budget-session-begins-budget-will-be-presented-on-march-11-maha-vikas-aghadi-shiv-sena-congress-ncp-bjp-cm-uddhav-thackeray-devendra-fadnavis-news-1037615 

 Maharashtra Budget Session Vidhan Sabha LIVE:  राज्यपाल यांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु, विरोधकांच्या घोषणाबाजी सुरुच

 Maharashtra Budget Session Vidhan Sabha LIVE:  राज्यपाल यांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु, विरोधकांच्या घोषणाबाजी सुरुच

एसटी संदर्भात अहवालाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, मंत्री अनिल परबांनी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला

एसटी संदर्भात अहवालाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, मंत्री अनिल परबांनी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपची स्वाक्षरी मोहीम, तर संजय राऊत मलिक कुटुंबाच्या भेटीला

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपची स्वाक्षरी मोहीम, तर संजय राऊत मलिक कुटुंबाच्या भेटीला

https://marathi.abplive.com/news/mumbai/maharashtra-budget-session-bjp-s-signature-campaign-for-nawab-malik-s-resignation-1037931 

OBC Reservation : मध्यप्रदेशप्रमाणं राज्य सरकारनं कायद्यात बदल करावा, आम्ही पाठिंबा देऊ : देवेंद्र फडणवीस

OBC Reservation : मध्यप्रदेशप्रमाणं राज्य सरकारनं कायद्यात बदल करावा, आम्ही पाठिंबा देऊ : देवेंद्र फडणवीस

OBC Reservation Maharashtra Budget Session LIVE: विधानसभेत ओबीसी आरक्षणावरील चर्चेत गोंधळ, फडणवीस-भुजबळ आमनेसामने, भाजप आमदार आक्रमक, वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी

OBC Reservation Maharashtra Budget Session LIVE: विधानसभेत ओबीसी आरक्षणावरील चर्चेत गोंधळ, फडणवीस-भुजबळ आमनेसामने, भाजप आमदार आक्रमक, वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी

Maharashtra Budget Session LIVE: ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक, अंतरिम अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित

 Maharashtra Budget Session LIVE:  ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक, अंतरिम अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित

 Maharashtra Budget Session LIVE: एसटी विलीनीकरणचा अहवाल आज सभागृहात ठेवला जाणार, मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाल्यांनतर आज सभागृहात मांडणार

 Maharashtra Budget Session LIVE: एसटी विलीनीकरणचा अहवाल आज सभागृहात ठेवला जाणार, मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाल्यांनतर आज सभागृहात मांडणार

विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल आहे. त्यामुळे आज सभागृहात भाजप पाठिंबा देणार का?

Maharashtra Budget Session LIVE: पायऱ्यांवर बसून भाजपचा आंदोलन, नवाब मलिक आणि ओबीसी आरक्षण मुद्यावरुन विरोध

 Maharashtra Budget Session LIVE: पायऱ्यांवर बसून भाजपचा आंदोलन, नवाब मलिक आणि ओबीसी आरक्षण मुद्यावरुन विरोध

 Maharashtra Budget Session LIVE:  विधानभवनात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची बैठक सुरु

 Maharashtra Budget Session LIVE:  विधानभवनात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची बैठक सुरु, विरोधकांच्या आरोपला उत्तर देण्यासाठी रणनीती आखणार, नवाब मलिक प्रकरण आणि ओबीसी आरक्षण यावरती विरोधक आज होणार आक्रमक

नाना पटोले काय खुलासा करणार? ट्वीट करत दिली पूर्वसूचना

थोड्याच वेळात मोठा खुलासा करत आहे. गांधी भवन, पहिला मजला तन्ना हाऊस, रिगल सिनेमाजवळ कुलाबा मुंबई.- नाना पटोले 

ओबीसी अहवाल फेटाळावा अशीच सरकारची इच्छा होती- चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले...

ओबीसी आयोग गठित केला पण त्याला निधी दिला नाही

अहवाल फेटाळावा अशीच सरकारची इच्छा होती

राज्य सरकार मधील बोलघेवड्या नेत्यांमुळे ओबीसी आरक्षण गेले

महाविकास आघाडी सरकार ला ओबीसी आरक्षण नको आहे

मोठ्या महानगरपालिकेत यांना मोठे व्यापारी धनदांडगे यांना बसवायचे आहे

हे मोघल शाही सरकार

आम्ही एकाही शेतकऱ्यांची वीज कापली नाही

मागच्या सरकारने तिन्ही वीज कम्पन्या नफ्यात ठेवल्या होत्या

आता या कंपन्या तोट्यात आहेत ते यांच्या भ्रष्टाचारामुळे

शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे

मंत्री आमदार यांना जनता रस्त्यावर फिरू देणार नाही

 Maharashtra Budget Session LIVE:  विधीमंडळ कामकाज सुरू होण्याच्या आधी महाविकास आघाडी नेत्यांची बैठक

 Maharashtra Budget Session LIVE:  विधीमंडळ कामकाज सुरू होण्याच्या आधी महाविकास आघाडी नेत्यांची बैठक, विधानभवनात थोड्याच वेळात महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक , विरोधकांकडून राजकीय कोंडी होण्याच्या दृष्टीने प्रतिउत्तर देण्याबाबत होणार चर्चा , अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, अनिल परब, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई बैठकीस राहणार उपस्थित, विरोधक नवाब मलिक आणि ओबीसी राजकीय आरक्षण रद्द यावर आंदोलन करणार, त्यास उत्तर देण्याची रणनिती  महाविकास आघाडी नेते ठरणार

Maharashtra Budget Session LIVE: 'प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात मात्र भाजपाल'; नाना पटोलेंची राज्यपालांवर टीका
Maharashtra Budget Session LIVE: आज अधिवेशनाचा दुसरा दिवस, ओबीसी आरक्षणासह मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक होणार
OBC Reservation News : जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणूक होणार नाही: मंत्रिमंडळ बैठकीत एकमत

OBC Reservation News : जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणूक होणार नाही: मंत्रिमंडळ बैठकीत एकमत

Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची बैठक विधानभवन येथील समिती कक्षात सुरू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती
Maharashtra Budget Session LIVE:  भाजपा आमदारांची रात्री बोलावली बैठक, अधिवेशनातील रणनितीवर चर्चा

Maharashtra Budget Session LIVE:  भाजपा आमदारांची रात्री बोलावली बैठक,  सागर बंगला येथे बैठक, देवेंद्र फडवणीस यांनी बोलावली बैठक, अधिवेशनातील रणनितीवर चर्चा

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक होणार,  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबई मोर्चा निघणार

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक होणार, अधिवेशन सुरू असताना भाजप नवाब मलिक यांच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबई मोर्चा होणार, मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रदेश भाजपतर्फे 9 मार्च रोजी मुंबईत राणीचा बाग ते आझाद मैदान मोर्चा 

Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची बैठक विधानभवन येथील समिती कक्षात सुरू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची बैठक विधानभवन येथील समिती कक्षात सुरू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

राज्य सरकार निवडणुका आणि आरक्षणासंदर्भात जे काही करायचं आहे ते आम्ही करू - सुनील प्रभू

राज्य सरकार निवडणुका आणि आरक्षणासंदर्भात जे काही करायचं आहे ते आम्ही करू . सर्वोच्च न्यायालयाचा आम्ही आदर करतो . राज्यात निवडणुका करायच्या आहेत त्यासाठी काय करायचं आहे ते योग्य करू . आशिष शेलार आता आरोप करत आहेत आधीचं सरकारमध्ये काय केलं .आता आरोप करून काय फायदा - सुनील प्रभू

Sanjay Daund shirshasana: राज्यपालांचा निषेध, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदारांचं शीर्षासन- ABP Majha

Aaditya Thackeray : राज्यपालांनी अभिभाषण सोडून जाणं लाज वाटण्यासारखी गोष्ट: आदित्य ठाकरे ABP Majha

Devendra Fadnavis on Nawab Malik : मंत्री जेलमध्ये असूनही राजीनामा घेतला जात नाही हे गंभीर: फडणवीस

Maharashtra Budget Session 2022 -जेलमध्ये स्क्रिन लावा म्हणजे आम्ही त्यांना प्रश्न विचारू शकू-प्रवीण दरेकर

Maharashtra Budget Session 2022 Pravin Darekar on Nawab Malik: राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विधीमंडळाचे कामकाज सुरू झाल्यानंतर भाजपने मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की,  25 वर्षांनंतर शिवसेनेला साप दिसला. देशाच्या विरोधात ज्याने फणा काढला त्यालाच तुम्ही कॅबिनेटमध्ये बसवलं, तर तो मुख्यमंत्र्यांना दंश करेल. त्यापेक्षा त्यांना कॅबिनेट मधून हटवा, अशी टीका दरेकरांनी मलिकांचं नाव न घेता केली. 

जेलमध्ये स्क्रिन लावा म्हणजे आम्ही त्यांना प्रश्न विचारू शकू

प्रवीण दरेकर म्हणाले की, देशद्रोही दाऊद इब्राहिम यांच्याशी जागेचा व्यवहार करणाऱ्या नवाब मलीक यांचा राजीनामा घ्यावा. देशद्रोही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ. सभापती यांच्याकडे बोलण्यासाठी परवानगी मागितली परंतु त्यांनी मला बोलू दिलं नाही. त्यांनी जेलमध्ये स्क्रिन लावा म्हणजे आम्ही त्यांना प्रश्न विचारू शकू. जर ते जेल मध्ये असतील मग त्यांच्या खात्याच्या कमकाजाचं काय होईल, असं ते म्हणाले. 

दुपारी एक वाजता मंत्रिमंडळ बैठक, ओबीसी आरक्षणासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार चर्चा

#BREAKING : दुपारी एक वाजता मंत्रिमंडळ बैठक, ओबीसी आरक्षणासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार चर्चा

https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-budget-session-live-updates-state-budget-session-begins-budget-will-be-presented-on-march-11-maha-vikas-aghadi-shiv-sena-congress-ncp-bjp-cm-uddhav-thackeray-devendra-fadnavis-news-1037615 

Maharashtra Budget Session LIVE: राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न राज्यपालांकडून सुरू - यशोमती ठाकूर

Maharashtra Budget Session LIVE: राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न राज्यपालांकडून सुरू आहे. जाणीवपूर्वक नवाब मलीक यांच्या विरोधात घोषणाबजी भाजपने सूरू केली त्यावेळी ते गप्प राहिले माञ ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणबाजी सूरू होती त्यावेळी माञ त्यानी बोलायला सुरूवात केली आणि मधूनच निघून गेले - यशोमती ठाकूर

लता मंगेशकर यांच्या शोकप्रस्तावादरम्यान विधानपरिषदेतून भाजपचा सभात्याग, विधानपरिषदेत प्रविण दरेकरांसह इतर भाजप सदस्य परतले

लता मंगेशकर यांच्या शोकप्रस्तावादरम्यान विधानपरिषदेतून भाजपचा सभात्याग, विधानपरिषदेत प्रविण दरेकरांसह इतर भाजप सदस्य परतले

Maharashtra Budget Session LIVE: भास्करराव जाधव, कालिदास कोळमकर, संजय शिरसाट, कुणाल पाटील, दिपक चव्हाण यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड

Maharashtra Budget Session LIVE: भास्करराव जाधव, कालिदास कोळमकर, संजय शिरसाट, कुणाल पाटील, दिपक चव्हाण यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड

Maharashtra Budget Session LIVE: विधानसभा कामकाजाला सुरुवात, भाजप आक्रमक, नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी

 Maharashtra Budget Session LIVE:  विधानसभा कामकाजाला सुरुवात, भाजप आक्रमक, नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Budget Session LIVE: आमदार संजय दौंड यांनी शीर्षासन करुन राज्यपालांचा निषेध केला

Maharashtra Budget Session LIVE:  आमदार संजय दौंड यांनी शीर्षासन करुन राज्यपालांचा निषेध केला

Maharashtra Budget Session LIVE: राज्यपालांनी भाषण थांबवलं, अभिभाषण पटलावर ठेवत राज्यपाल थांबले, भाषण न करताच राज्यपाल निघाले

Maharashtra Budget Session LIVE: राज्यपालांनी भाषण थांबवलं, अभिभाषण पटलावर ठेवत राज्यपाल थांबले, भाषण न करताच राज्यपाल निघाले #BudgetSession #Maharashtra

https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-budget-session-live-updates-state-budget-session-begins-budget-will-be-presented-on-march-11-maha-vikas-aghadi-shiv-sena-congress-ncp-bjp-cm-uddhav-thackeray-devendra-fadnavis-news-1037615

Maharashtra Budget Session LIVE: राज्यपालांचं अभिभाषण सुरु; राज्यपाल येताच छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा

Maharashtra Budget Session LIVE:  राज्यपालांचं अभिभाषण सुरु; राज्यपाल येताच छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा

Maharashtra Budget Session LIVE: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी विधानभवन येथे आगमन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी विधानभवन येथे आगमन झाले. आजपासूनच विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात आगमन होताच प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

राज्यपाल विधान भवन परिसरात दाखल

राज्यपाल विधान भवन परिसरात दाखल

Maharashtra Budget Session LIVE:   मुख्यमंत्री विधानभवनात पोहचले, आदित्य ठाकरेंनी केलं वाहनाचं सारथ्य

Maharashtra Budget Session LIVE:   मुख्यमंत्री विधानभवनात पोहचले, आदित्य ठाकरेंनी केलं वाहनाचं सारथ्य, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण , त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित

Maharashtra Budget Session LIVE: विधानभवनाच्या पायऱ्यांवरील आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर सहभागी

Maharashtra Budget Session LIVE: विधानभवनाच्या पायऱ्यांवरील आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर सहभागी

Maharashtra Budget Session LIVE: विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचे आंदोलन सुरु, नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

Maharashtra Budget Session LIVE: विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचे आंदोलन सुरु, नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

#BudgetSession #Maharashtra

Maharashtra Budget Session LIVE: विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचे आंदोलन सुरु

 Maharashtra Budget Session LIVE:  विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचे आंदोलन सुरु

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाराजांचा फोटो

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी पायऱ्या चढताना अडचण होऊ शकते यासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाराजांचा फोटो ठेवण्यात आला आहे

अधिवेशनात गाजणार 'हे' मुद्दे 

  • आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचारचे आरोप

  • नवाब मलिक यांचा राजीनामा

  • किरीट सौमय्यांवर झालेले आरोप

  • नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावरील कारवाई

  • केंद्रीय यंत्रणांचा वापर 

  • ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण 

  • कोरोना काळातील भ्रष्टाचार

  • शेतकऱ्यांची वीजबील माफी

  • पीक विमा  

  • 12 निलंबीत आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा प्रश्न 

  • राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा निलंबित प्रश्न 

  • केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राज्यातील सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली होती. त्यानुसार राज्य सरकार आता काय तरतुदी करते यावरून लक्ष ठेवून भाजप सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.

Maharashtra Budget Session 2022 : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Maharashtra Budget Session 2022 : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतेय. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. 

पार्श्वभूमी

Maharashtra Budget Session 2022 :  राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरु आहे. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. 

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून रणनिती आखली जात आहे. काल (बुधवारी) दोन्ही बाजूंकडून बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. तर विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांची बैठकही मुंबईत झाली. या बैठकीत भाजपनं अधिवेशनाची रणनीती आखली असून विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. 

महाविकास आघाडीमधील दोन मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर विरोधी पक्षाच्या निशाण्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक असणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहामध्ये गाजणारा हा सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे. यासह, आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचारचे आरोप, भाजप नेते किरीट सौमय्यांवर झालेले आरोप, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावरील कारवाई, केंद्रीय यंत्रणांचा वापर या आणि अशा अनेक मुद्द्यांवर यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.  

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनेक घडामोडी घडत गेल्या आहेत. यावरूनच विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुंपलेली दिसत आहे. याच घडामोडींदरम्यान 3 मार्च ते 25 मार्च पर्यंत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे. महाविकास आघाडी सरकारचं हे तिसरं अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. 
 
नवाब मलिक यांच्या मुद्द्यांवर प्रत्त्युर देण्यासाठी भाजप नेते किरीट सौमय्या आणि केंद्रीय पथकांच्या वापरासह केद्रातील घडामोडींवर सत्ताधारी विरोधकांना कोंडीत पकडण्याच्या तयारीत असणार आहेत. तर राज्यातील वीजेचा प्रश्न, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन यासह विविध मुद्यांवर विरोधकही सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सर्वात महत्वाची बाब ठरणार आहे. ती म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही आवाजी पद्धतीने व्हावी यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ झाला होता.

अधिवेशनात गाजणार 'हे' मुद्दे 

  • आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचारचे आरोप

  • नवाब मलिक यांचा राजीनामा

  • किरीट सौमय्यांवर झालेले आरोप

  • नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावरील कारवाई

  • केंद्रीय यंत्रणांचा वापर 

  • ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण 

  • कोरोना काळातील भ्रष्टाचार

  • शेतकऱ्यांची वीजबील माफी

  • पीक विमा  

  • 12 निलंबीत आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा प्रश्न 

  • राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा निलंबित प्रश्न 

  • केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राज्यातील सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली होती. त्यानुसार राज्य सरकार आता काय तरतुदी करते यावरून लक्ष ठेवून भाजप सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.