बारामती : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध महायुती (Mahayuti) असा सामना रंगणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून (Baramati Assembly Constituency) कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्यात लढत होत आहे. अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. अजित पवार आज बारामती तालुक्यात गावभेट दौरा करीत आहेत. अजित पवार यांनी बारामतीतील पाणी प्रश्नावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. नियम डावलून बारामतीकरांना पाणी दिल्याचं अजित पवार यांनी म्हटले आहे. 


काय म्हणाले अजित पवार? 


बारामती तालुक्यात पाणी प्रश्न मोठी समस्या आहे. अनेक गावांना उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. याबाबत अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, नियमात नव्हतं तरी बारामतीकरांना पाणी दिलं. नियम डावलून बारामतीकरांना पाणी दिले. नियमात नव्हतं तरी नियम डावलून पाणी सोडण्यास भाग पाडले दिले. नेतृत्वात धमक असावी लागते. माझ्या लोकांचे नुकसान होत आहे, मला पाणी पाहिजे असे मी सांगितले आणि पाणी आणले. आपले काम अशा प्रकारे सुरु आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील कटफळ गावात ग्रामस्थांशी बोलताना केले आहे. 


अजित पवारांचं आवाहन


बारामती दौऱ्यावर असताना सावळ गावात बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकसभेला जर सुप्रिया पडली असती तर साहेबांना या वयात कसं वाटलं असतं, म्हणून तुम्ही सुप्रियाला मतदान केलं. त्यामुळे आता विधानसभेला तुम्ही मला मतदान करा. लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला पण खुश करा. साहेब साहेबांच्या परीने विकास करतील मी माझ्या पध्दतीने तालुक्याचा विकास करेल असे अजित पवार म्हणालेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Chhagan Bhujbal: 'निदान पुढच्या वर्षी तरी त्यांनी एकत्र आलं पाहिजे,' अजितदादा-सुप्रिया सुळेंवरील भुजबळांच्या विधानाची चर्चा!


अजित पवारांनी धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढलं आणि चिन्ह पण चोरलं, चोरांच्या टोळीपासून सावध राहा, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल