Jitendra Awhad on Ajit Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) हिंमत असेल तर नवं चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी असं आव्हान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिलं आहे. चोरांच्या टोळीपासून सावध राहा असाही सल्लाही आव्हाड यांनी दिला आहे. अजित पवारांनी धक्के मारुन शरद पवारांना (Sharad Pawar) बाहेर काढलं आणि चिन्ह पण चोरलं अशी टीका देखील आव्हाडांनी केली. 


ठाण्यातील चंदननगर मुंब्रा या ठिकाणी आयोजित केलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचा होता. पण एके दिवशी अजित पवार येतात आणि  धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढतात.  जाताना त्यांच्याकडी घड्याल देखील हिसकावून नेतात. ही चोरांची टोळी आहे अस म्हणत आव्हाडांनी अजित पवारांवर टीका केली. अजित पवारांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी नवं चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी असंही ते म्हणाले. जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आणि आर्थिक सहाय्यता देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात महंगाई वाढली त्यात सरकारची तिजोरी देखील रिकामी बदलापुर हत्याकांडावर भाजपा सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली. मतदात्यांना जागरूक राहून जुल्मी विरोधी लढाईत सहभागी होण्याचं आवाहन जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.


पराभव समोर दिसत असल्याने जितेंद्र आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडलं, सुरज चव्हाण यांची टीका


दरम्यान, अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड  यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. पराभव समोर दिसत असल्याने जितेंद्र आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. कदाचित त्यांना लोकशाही मान्य नसल्याने असं वक्तव्य त्यांनी केलं असावं. पक्ष हा कोणतीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये. तर लोकांनी निर्माण केलेलं संघटन आहे. निवडणूक आयोगाने हे चिन्ह अजित पवारांना दिलं आहे. लोकांनी दादाचं नेतृत्व स्विकारलेलं आहे. आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी असं वक्तव्य केलं असावं. जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत. प्रसिद्धी झोतात येण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे, असं सूरज चव्हाण म्हणालेत.


महत्वाच्या बातम्या:


लायकीच्या पलीकडं जाऊन अजितदादांवर टीका करु नका,  बुद्धी जागेवर येण्यासाठी रोहित पाटलांचं पाय धुवून पाणी प्या,  मिटकरींचा आव्हाडांवर हल्लाबोल