Shambhuraj Desai on Arvind Sawant : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी शायना एनसी (Shaina NC) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन चांगलच वादंग निर्माण झालं आहे. याच मुद्यावरुन मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी अरविदं सावंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांचं थोबाड फोडलं असतं, अशी टीका सावंत यांनी केलीय. महिलांबाबत अर्वाच्य, लांचनास्पद, अपमानास्पद बोलणं अत्यंत दुर्दैवी आहे. अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्याला राज्यातील महिला नक्कीच उत्तर देतील अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे .
नेमकं काय म्हणाले होते अरविंद सावंत?
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी शिवसेना नेत्या शाइन एनसी यांच्यावर निशाणा साधला आणि सांगितले की, त्यांची अवस्था बघा, त्या आयुष्यभर भाजपमध्ये राहिल्या आता दुसऱ्या पार्टीत गेल्या आहेत. इथं 'इम्पोर्टेड माल' चालत नाही, फक्त ओरिजनल माल येथे चालतो. त्यांच्या वक्तव्यावर मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांनी पलटवार करत माफी मागण्याची मागणी केली. "ते स्त्रीचा आदर करू शकत नाहीत," असे त्या म्हणाल्या. तसेच भाजपने देखील अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली होती.
अरविंद सांवत यांच्याकडून जाहीर दिलगिरी
मी महिलांचा कधीही अपमान केला नाही आणि करणारही नाही. माझ्या वक्तव्यामुळं जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलं. 29 तारखेला मी जे काही बोललो आहे, त्यानंतर 1 तारखेला अनेक भगिनी या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि माझ्या वर गुन्हा दाखल झाल्याचे सावंत म्हणाले. अरविंद सावंत यांनी शायना एनसी (Shaina NC) यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य केलं होतं. याबाबत त्यांनी माफी मागितली आहे.
शरद पवारांनी तक्रार केल्यास चौकशी केली जाईल
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या टीकेला देखील देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं. सत्ताधारी गटाच्या उमेदवारांना पोलीस अधिकाऱ्यांच्या गाडीतून रसद पुरवली जात असल्याचं वक्तव्य देसाई यांनी केलं होते. याबाबत बोलताना शंभुराज देसाई यांनी शरद पवारांनी तक्रार केल्यास चौकशी केली जाईल असे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या: