Maharashtra Assembly election : आचारसंहिता लागण्याच्या आधीच अधिकाऱ्यांनी मंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयाला टाटा बाय बाय केला आहे. नविन सरकार येण्याच्या आधीच मंत्री आस्थापना आणि मुख्यमंत्री कार्यालयातील  अधिकाऱ्यांनी क्रीम पोस्ट घ्यायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील ज्या अधिकाऱ्यांवरती महत्त्वाची जबाबदारी होती त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ चांगल्या क्रीम पोस्ट वरती आपली बदली करून घेतली आहे.


सरकार कोणाचे येणार याबाबत शाशंकता असल्याने निर्णय घेतल्याची चर्चा 


आगामी कोणाचं सरकार येईल याची शाशंकता असल्याने अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला का? याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. ठराविक अधिकारीच कुठे असले तरी क्रीम पोस्टवरती असतात तर काही अधिकाऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे वंचित असल्याची भावना असते. 


कोणत्या अधिकाऱ्यांनी कुठे बदली करुन घेतली ?


1. व्यंकटेश भट, सहसचिव, मुख्यमंत्री कार्यालयात (गृह विभाग ) 


बदलीचे ठिकाण-  उद्योग विभागात


2. कैलास बिलोनीकर-  सहसचिव, मुख्यमंत्री कार्यालय 


बदलीचे ठिकाण -जलसंपदा विभाग


3. सचिन सहस्रबुद्धे- उपसचिव मुख्यमंत्री कार्यालय 


बदलीचे ठिकाण- ग्रामविकास विभाग


4. चंद्रशेखर तरंगे- उपसचिव मुख्यमंत्री कार्यालय 


बदलीचे ठिकाण -गृहनिर्माण विभाग


5. मनोज कुमार महाले- उपसचिव, मुख्यमंत्री कार्यालय 


बदलीचे ठिकाण-  महसूल विभाग


6. मंगेश शिंदे- सहसचिव, मंत्री दीपक केसरकर यांचे खाजगी सचिव 


बदलीचे ठिकाण- शालेय शिक्षण विभाग


इतर महत्त्वाच्या बातम्या 


BJP : चित्रा वाघ, पोहरादेवीचे महंत उद्या सकाळी आमदारकीची शपथ घेणार? आचारसंहितेपूर्वी भाजपची राज्यपाल नियुक्त आमदारांची 3 नावं ठरली