Continues below advertisement

नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची महत्त्वकांक्षी योजना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना  (Maharashtra Aapla Dawakhana Yojana) यावर आता भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे. हे आरोप दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर सत्ताधारी भाजपच्या (BJP) आमदाराने केले आहेत. आपला दवाखाना हा भ्रष्टाचाराचं कुरण झालंय का असा प्रश्न निर्माण झालाय, असं भाजप आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhanre) यांनी केला. ते विधानपरिषदेत (Vidhan Parishad Live ) बोलत होते.

विधानपरिषदेत आज आपला दवाखाना आणि आरोग्याशी संबंधित प्रश्नांना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) हे उत्तरं देत होते. यावेळी अनेक आमदारांनी आरोग्य मंत्र्‍यांना प्रश्न विचारले. यावेळी ठाणे-कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी थेट मुद्द्याला हात घातला. डावखरे म्हणाले, "माननीय मंत्री महोदय प्रकाश आबिटकर यांनी मगाशी उत्तरामध्ये सांगितलं की माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमाने ही योजना राज्यांमध्ये आली. अतिशय चांगल्या हेतूने ही योजना आणली होती. पण आपण आता खाली जर बघितलं तर या योजनेमध्ये भ्रष्टाचाराच कुरण तयार झालंय का? असा प्रश्न निर्माण होतो. शासनाचे हेतू चांगला आहे पण खाली जे अधिकारी आहेत, स्थानिक लेव्हलवरती ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अधिकारी आहेत, ते भ्रष्टाचार करतात का हा प्रश्न निर्माण होतोय. त्याचं कारण असं आहे की ठाण्यामध्ये जो हा आपला दवाखाना क्लिनिक होतं, ते तुम्हाला बंद आढळलं का? त्या तिकडे साडीचं दुकान होतं का? हा माझा प्रश्न आहे. याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेकडून अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन थातूर मातूर उत्तरं दिली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली का? केली असेल तर सभागृहाला सांगा"

Continues below advertisement

इतकंच नाही तर ही योजना गोरगरिबांसाठी आणली आहे. पण मी दोन प्रश्न विचारले. लोकांपर्यंत ही योजना पोचायला हवी. पण या योजनेत केवळ टेस्टिंग होतं आणि मग पुढे हॉस्पिटलला पाठवण्यास सांगितलं जातं. मग पुढे पुन्हा तेच तेच प्रश्न उपस्थित होतात, असं डावखरे म्हणाले. आपला दवाखानामध्ये डॉक्टर्स, नर्सेस नसतात. काही टेक्निशियन्स असतात.  या योजनेनुसार जे लोक तिथे उपलब्ध हवेत, ते असतील का असा प्रश्न डावखरे यांनी प्रकाश आबिटकरांना विचारला. 

त्यावर प्रकाश आबिटकरांनी उत्तर देताना म्हणाले, मी माहिती घेतो. ठाणे मनपामध्ये ज्या त्रुटी असतील तर त्यामध्ये तात्काळ कारवाई करु, कोणालाही सूट देणार नाही. या योजनेमध्ये जो स्टाफ आहे, त्याबाबत आणखी सूचनांचं स्वागत करुन अंमलबजावणी करु. कारण मोहल्ला क्लिनिकसारख्या या योजनांमुळे गोरगरिबांना लाभ मिळतात, असं आबिटकर म्हणाले.  

VIDEO :  डावखरेंचे सवाल, आबिटकरांची उत्तरे

संबंधित बातम्या 

फलटणमध्ये आयुष्य संपवलेल्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूबाबत देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची माहिती, म्हणाले, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये..