Mahendra Dalvi cash video: अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा पैशांच्या बंडलांसोबतचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना पाठवला असू शकतो. त्यांचे ठाकरे गटाशी साटेलोटे आहे. रायगडमधील सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे कुटीलनीतीचे राजकारण पाहता कदाचित त्यांनीच हा व्हिडीओ अंबादास दानवे यांना पाठवला असू शकतो. आम्ही घरातच शत्रू पाळून ठेवला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाने आणि रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या रुपाने आम्ही शत्रू पाळला आहे, असे खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी केले. नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) हे अडचणीत आले आहेत. अशातच आता शिंदे यांच्या शिवसेनेने अजितदादांच्या पक्षावर गंभीर आरोप करुन खळबळ उडवून दिली आहे. (Raigad Politics news)

Continues below advertisement

महेंद्र थोरवे यांनी दळवींचा व्हिडीओ व्हायरल होण्यात सुनील तटकरे यांचा हात असल्याचा संशय थेटपणे बोलून दाखवला. मला आत्मविश्वास आहे की, महेंद्र दळवी असं काही करणार नाहीत. अंबादास दानवे यांनी जाणीवपूर्वक अधिवेशनच्या काळात हा व्हिडीओ व्हायरल केला. रायगडमध्ये ज्याप्रकारचं राजकारण सुरु आहे त्याच्याशी या सगळ्याचा धागा असावा. सुनील तटकरे हे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सातत्याने करतात. ते कुटीलनीतीचं राजकारण खेळतात. त्यामुळे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे यांनी संगनमताने महेंद्र दळवी यांचा व्हिडीओ व्हायरल केला असावा. 

अंबादास दानवे यांना सुनील तटकरेंची साथ असू शकते. आम्ही तटकरेंच्या रुपाने घरात शत्रू पाळला आहे. शिवसेना-भाजप-रिपाई ही पारंपरिक युती असताना भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करुन घेतले होते. त्याचा फटका आम्हाला रायगडमध्ये बसत आहे. सुनील तटकरे विरोधकांना हाताशी धरुन अनेक गोष्टी करतात. त्याप्रमाणेच त्यांनी आताही ठाकरे गटाशी साटेलोटे करुन महेंद्र दळवी यांचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा संशय महेंद्र थोरवे यांनी बोलून दाखवला. यावर आता सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Continues below advertisement

Ambadas Danve: नेमकं प्रकरण काय?

अंबादास दानवे यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. या व्हिडीओत महेंद्र दळवी यांचा चेहरा दिसत असून एक व्यक्ती टेबलवर नोटांची बंडलं काढून ठेवताना दिसत आहेत.या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे!जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?, असे अंबादास दानवे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा

नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...