Devendra Fadnavis on Phaltan doctor girl suicide: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीचा मृत्यू हा गळा दाबून झालेला नाही. तिने गळफास घेतल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टमधून निष्पन्न झाल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. ते मंगळवारी विधानसभेतील चर्चेदरम्यान बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाविषयी (Suicide news) सविस्तर भाष्य केले. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. एक म्हणजे या तरुणीच्या हातावर जो मजकूर लिहला होता, ते हस्ताक्षर तिचेच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या तरुणीचा मृत्यू फास घेतल्यामुळेच झाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Continues below advertisement

या प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकारी गोपाळ बदने याने तरुणीची फसवणूक करुन तिचे शारीरिक शोषण केले. मोबाईलमधील चॅटसमधून ही गोष्ट समोर आली आहे. गोपाळ बदने याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले होते. पण नंतर त्याने वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे तरुणीने सुसाईड नोटमध्ये गोपाळ बदने आणि आणखी एका तरुणाचे नाव लिहले होते. एकीकडे बदने तिची फसवणूक करुन तिचे शारीरिक शोषण करत होता. तर दुसरीकडे दुसऱ्या तरुणानेही परिस्थितीचा फायदा घेऊन डॉक्टर तरुणीची फसवणूककेली. त्यामुळे तिने या दोघांची नावं लिहून आत्महत्या केली. तिचा मृत्यू गळा दाबून झालेला नाही, तर गळफास लागल्यामुळेच झाला आहे. याप्रकरणाचा तपास अजून संपलेला नाही. मात्र, आता याप्रकरणात आरोपपत्र दाखल केले जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Phaltan crime news: पोलिसांच्या दबावाचा आणि आत्महत्येचा संबंध नाही: देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement

ही तरुणी फलटण उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर होती. एखाद्या आरोपीला अटक करताना तो अटकेसाठी फिट आहे की नाही, यासाठी वैद्यकीय अहवाल घ्यावा लागतो. या डॉक्टर तरुणीने काही आरोपी अनफिट असल्याचे रिपोर्ट दिले होते. त्यामुळे पोलिसांनी तिच्या वरिष्ठांना पत्र लिहले होते. यामध्ये त्यांनी सांगितले होते की, संबंधित आरोपी हे मोठ्या गुन्ह्यात पकडण्यात आले आहेत. त्यांना अनफिट प्रमाणपत्र दिले जात आहे. याची चौकशीही झाली. हे सर्व पाच महिने आधी घडले होते. त्यामुळे पोलिसांच्या दबावाचा आणि आत्महत्येचा संबंध नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा

नाईक निंबाळकरांच्या 27 पिढ्यांच्या ब्रँडची अब्रू घालवलीत, फलटण डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणावरुन रामराजे कडाडले