Maha Vikas Aghadi Seat Sharing : आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात (Seat Sharing) मुंबईत महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभेसाठी जागा वाटपाच्या रणनितीवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. मुंबईत महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढणार आहे. याबाबत महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi)  इतर पक्ष सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (Shivsena Uddhav Thackeray) 20 ते 22 जागांवर दावा ठोकलाय, याबाबतची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीये. 


शिवसेना ठाकरे गटाकडून 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 ते 22 जागांसाठी आग्रह


मुंबई झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत  मुंबईतील विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. महाविकास आघाडीत मुंबईत शिवसेना ठाकरे गटच जागा वाटपात मोठा भाऊ असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाला अधिक जागा देण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सकारात्मक आहे. शिवसेना ठाकरे गटाने 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 ते 22 जागांसाठी आग्रह धरला आहे. काँग्रेस पक्ष हा 13 ते 15 जागांवर आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाच ते सात जागांवर दावा 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा पाच ते सात जागांवर आपला दावा सांगत आहे. काही जागा संदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही.  मुंबईतील काही जागांवर महाविकास आघाडीतील दोन्ही  तर काही जागांवर तिन्ही पक्ष  दावा करत आहेत. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.  महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागा वाटपात 2019 मध्ये जिंकलेल्या जागा सोडून  उर्वरित जागांवर इच्छुक उमेदवार आणि त्या पक्षाची ताकद यावर चर्चा झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या मतदार संघामध्ये सुद्धा एक ते दोन जागांमध्ये अदलाबदल होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 7 जागा लढवण्याची तयारी सुरु


उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP Ajit Pawar) मुंबईतील 7 जागा लढवण्याची तयारी सुरु केली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लवकरच मुंबईतील जागांचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये मुंबादेवी, भायखळा, अनुशक्तीनगर, चेंबूर, मानखुर्द- शिवाजीनगर, वांद्रे पूर्व आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघ लढण्यासाठी इच्छुक आहे. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलीये. 


कोणत्या मतदारसंघातून कोण इच्छुक ?


मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार इच्छुक, भायखळा- समीर भुजबळ, अनुशक्ती नगर- सना मलिक, मानखुर्द शिवाजीनगर- नवाब मलिक, वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ- झीशान सिद्धकी, विक्रोळी विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटातील एक चेहरा लवकरच सोबत येण्याची शक्यता आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Ajit Pawar NCP : मोठी बातमी : अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबईतील 7 जागा लढवण्याची तयारी