Ajit Pawar NCP : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP Ajit Pawar) मुंबईतील 7 जागा लढवण्याची तयारी सुरु केली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लवकरच मुंबईतील जागांचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये मुंबादेवी, भायखळा, अनुशक्तीनगर, चेंबूर, मानखुर्द- शिवाजीनगर, वांद्रे पूर्व आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघ लढण्यासाठी इच्छुक आहे. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलीये. 


कोणत्या मतदारसंघातून कोण इच्छुक ?


मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार इच्छुक, भायखळा- समीर भुजबळ, अनुशक्ती नगर- सना मलिक, मानखुर्द शिवाजीनगर- नवाब मलिक, वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ- झीशान सिद्धकी, विक्रोळी विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटातील एक चेहरा लवकरच सोबत येण्याची शक्यता आहे. शिवाय चेंबूर मतदारसंघातून सिद्धार्थ कांबळे निवडणूक लढवतील, असेही बोलले जात आहे. 


52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत आम्ही देत आहोत : अजित पवारांचा यवतमाळमधून शब्द 


यवतमाळमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, माझी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर आतापर्यंत सव्वा कोटी मायमाऊलींच्या बँक खात्यात दोन महिन्यांची रक्कम जमा झाली आहे. याव्यतिरिक्त मुलींच्या उच्च शिक्षणाचा 100 टक्के खर्च सरकार उचलणार आहे. 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत आम्ही देत आहोत. त्याचप्रमाणे माझ्या शेतकरी बांधवांना वीजबिल माफ केलं आहे. बारावी आणि पदवीधर तरुणांना प्रशिक्षण भत्ता सुद्धा आम्ही देत आहोत. अशा अनेक योजना आम्ही राबवत असून त्या पुढेही चालू राहाव्यात यासाठी महायुतीच्या उमेदवारांना तुम्ही निवडून देणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. जे करू ते महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी करू. 


राज्याच्या विकासासाठी मी कधी निधी कमी पडू दिला नाही


अजित पवार म्हणाले, नुकताच मी जो राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, त्यातून सर्व समाजघटकाला आम्ही काय दिलं, कोणकोणत्या अभिनव योजना देऊ केल्या, त्या सगळ्याची माहिती देण्यासाठी आम्ही ही जन सन्मान यात्रा काढली आहे. आधीचं सरकार असो, आताचं सरकार असो.. मी तेव्हाही अर्थमंत्री होतो आणि आताही अर्थमंत्री आहे. राज्याच्या विकासासाठी मी कधी निधी कमी पडू दिला नाही. 2019 ते 2024 या कालावधीत विकास कामांसाठी इंदापूर तालुक्याला 5 हजार 495 कोटी 34 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला.


इतर महत्वाच्या बातम्या


Ramdas Athawale : गडकरींनी देशातील अनेक रस्ते केले, पण कोकणातले रस्ते खराब, मला ट्रेनने यावे लागले : रामदास आठवले