सोलापूर शरद पवार (Sharad Pawar)  तिजोरीची किल्ली कंबरेला लावून फिरतात, पण ती किल्ली अजित पवारांना (Ajit Pawar)  देत नाहीत असं वक्तव्य सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)  यांनी केलंय. माढा लोकसभा मतदारसंघातले (Madha Lok Sabha Election)  महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकरांच्या प्रचारसभेत सदाभाऊ खोत बोलत होते.. या प्रचारसभेत सदाभाऊंनी शरद पवारांचा उल्लेख 'म्हातारा' असा केला आहे. 


सदाभाऊ खोत म्हणाले, बाप मुलगा कर्तबगार झाला की त्याच्या हातात प्रपंच  देतो आणि गप्प बसतो.  पण हा म्हातारा लय खडूस आहे.  तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतोय. अजित पवार किल्ली बघून बघून म्हातारे झाले. मग अजित पवरांच्या लक्षात आले की, हे म्हातारं कंबरेची किल्ली काढत नाही म्हणून दादा किल्लीला लोंबकळत म्हणतोय किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाही.   आम्हाला प्रपंच करू द्या, आम्ही कधी प्रपंच  म्हातारा झाल्यावर करायचा का?  म्हणून दादा विकासासाठी महायुतीमध्ये आले.   


म्हातारा झाला तरी प्रपंच सोडत नाही, सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टीका


ही लढाई खऱ्या अर्थाने वाडा विरुद्ध गावगाडा, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित  आहे.  या मतदारसंघात शरद पवारांविषयी अनेक गोष्टी ऐकायला येतील. साहेबांचे वय 84 म्हणून ते 84 सभा घेणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत. पण तुम्हीच मला सांगा सध्या साहेबांना काय काम आहे? त्यांना म्हशी वळायच्या आहेत का? की जनावारांना पाणी पाजायचय? सध्या त्यांचा धंदाच हा आहे. या वयात देखील आमच्या सारख्यांन संधी दिली जात नाही, अशी खंत देखील सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे.  


शरद पवारांचे वय कायमच चर्चेत 


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर कर्जत येथे झालेल्या मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावर टीका केली होती. त्यानंतर शरद पवारांचा मुद्दा कायम चर्चेत येत असतो. शरद पवारांच्या वयावरुन विरोधक कायमच टोले मारत असतात. अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. तसेच त्यांनी आराम करून मार्गदर्शन करावे, असंही म्हटलं होतं.  वयावर प्रश्न उठवणाऱ्यांना शरद पवारांनी प्रत्युत्तर देखील दिली आहे. मी अजुनही सक्रीय आहे. 82 काय आणि 92 काय मला फरक पडत नाही, असंही शरद पवार म्हणाले. अर्थात पवारांनी वयाच्या 92 पर्यंत सक्रिय राहण्याचे संकेत दिले आहे. तसेच सदाभाऊंच्या टीकेवर राष्ट्रवादी काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


Video: 



 


हे ही वाचा :


Madha Lok Sabha: शिंदे सेनेला शरद पवारांचा दे धक्का, करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार हाती घेणार तुतारी