Madha Lok Sabha Election 2024 : पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Election 2024) अखेर मोहित पाटील घराण्यातून बंडखोरी होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) घोषणेपूर्वीपासूनच माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघ चर्चेत होता. अद्याप माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम आहे. भाजपनं रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjeetsingh Naik Nimbalkar) उमेदवारी दिल्यानं माढ्यातील मोहिते पाटील नाराज झाले आणि अखेर हीच नाराजी आता बंडखोरीत रुपांतरीत होणार असल्याची माहिती मिळत आहे. अखेर आता धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) यांच्या पक्षात प्रवेश करु शकतात. येत्या 13 एप्रिलला शरद पवारांच्या उपस्थितीत मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. 


भाजपनं माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. यावरुन भाजप नेते आणि माढ्यातील राजकीय वर्तुळातील मोठं नाव असलेले मोहिते पाटील नाराज झाले. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मोहिते पाटलांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. पण उमेदवारी निंबाळकरांच्या पारड्यात पडली आणि संपूर्ण माढ्यानं अनेक राजकीय घडामोडी अनुभवल्या. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानंही केवळ माढा वगळता इतर सर्व जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. आता शरद पवार गटाकडून माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. येत्या 13 एप्रिलला मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 


13 एप्रिलला मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश 


येत्या 13 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत अकलूजमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. यावेळी मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील कोण कोण उपस्थित राहते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित राणामार का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. उमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांची बंडखोरी टाळण्याचे प्रयत्न केले. मात्र, धैर्यशील मोहिते पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती मिळतंय. 


दरम्यान, मोहिते पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील मोठं कुटुंब आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांचा मोठा प्रभाव आहे. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात मोहिते पाटलांचा गट सक्रिय आहे. मोहिते पाटलांच्या पक्ष प्रवेशनाने माढा लोकसभेसह सोलापूर लोकसभा मतदारसंघातही भाजपला फटका बसू शकतो.


पाहा व्हिडीओ : Madha Lok Sabha Election : शरद पवारांकडून माढ्यातून धैर्य़शील मोहिेतेंना उमेदवारी? : ABP Majha