Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज (दि.20) मुंबईतील 6 जागांसह राज्यातील 13 मतदारसंघात मतदान सुरु आहे. महाराष्ट्रात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48.66 टक्के मतदान झाले आहे. मुंबईतील सर्वजागांसह नाशिक, धुळे, पालघर, दिंडोरी, कल्याण, ठाणे, पालघर या मतदारसंघात मतदान सुरु आहे. महाराष्ट्रात सायंकाळी 5 वाजपर्यंत कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले? याची आकडेवारी जाणून घेऊयात...


कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान? 


महाराष्ट्र सरासरी –  48.66  टक्के 


भिवंडी  48.89 टक्के 
धुळे -48.81 टक्के 
दिंडोरी –  57.06 टक्के 
कल्याण –  41.70 टक्के 
उत्तर मुंबई – 46.91 टक्के 
उत्तर मध्य मुंबई –  47.32 टक्के 
उत्तर पूर्व मुंबई –  48.67 टक्के 
उत्तर पश्चिम मुंबई –  49.79 टक्के 
दक्षिण मुंबई - 44.22 टक्के 
दक्षिण मध्य मुंबई – 48.26 टक्के 
नाशिक - 51.16 टक्के 
पालघर –  54.32 टक्के 
ठाणे –  45.38 टक्के 


लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 07.00 वाजेपासून सुरुवात झाली. 31 - मुंबई दक्षिण मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 44.22 टक्के मतदान झाले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील 31- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी (अंदाजे) पुढीलप्रमाणे.. 


भायखळा -41 टक्के 
कुलाबा -34 टक्के  
मलबार हिल - 48 टक्के 
मुंबादेवी - 46 टक्के 
 शिवडी - 48 टक्के 
वरळी - 45 टक्के       


ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray : विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल