Loksabha Election 2024 मुंबई : राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. राज्यातील 13 मतदारसंघासह मुंबईतील ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया देत महायुतीच्या सर्व उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल, असा विश्वास दर्शवला आहे. सोबतच त्यांनी महविकास आघाडीवर हल्लाबोले करत मविआचे सर्व उमेदवार क्लीनबोल्ड होतील, अशी बोचरी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्र्याना जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.  


कोणाच्या विकेट पडतील हे मतदारराजा ज्येष्ठ आहे तो ठरवतो, असं कोणाच्या बोलण्याने विकेट पडत नाही. मुख्यमंत्र्यांनी मानत आणलं तर ते 50 जागाही जिंकतील. त्यासाठी ते तीन जागा पाकिस्तानातून देखील घेतील, त्यांचा काय भरोसा. अशी खोचक टीका करत जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्यूत्तर दिले आहे.


शासकीय यंत्रणा हाताशी धरून बोगस मतदान 


राज्यातील अनेक भागासह ठाण्यात बोगस मतदान सुरू आहे. शासकीय यंत्रणा हाताशी धरलेल्या आहेत. जिथे त्यांना कमी मतदान होणार आहे तिथे मशीन त्यांनी मुद्दाम स्लो केल्या आहेत. मतदार सकाळ पासून मतदानकेंद्रावर रांगा लावून ताटकळत उभे आहेत. मात्र, त्यावर कुणीही बोलायला तयार नाही. एक मत द्यायला जर पाच मिनिटं लागणार असतील तर पूर्ण दिवसात अवघे 120 च मतदान होईल,यादी ही चौदाशेची आहे.


निवडणूक आयोग जर कोणाच्या हाताखालचं भावलं बनून काम करणार असेल, तर अवघड आहे. अधिकारी मुद्दाम मशीन स्लो करणार असतील तर निवडणुकाच घेऊ नका, त्या रद्द करून टाका, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी अनेक आरोप करत मतदान केंद्रावरील गैरप्रकार प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


ही अतिशय लाज आणणारी गोष्ट-  जितेंद्र आव्हाड


निवडून ही कोणत्याही दबावाखाली होता कामा नये. हे असं दमदाटी करून पोरं घुसवून असं मतदान होत नाही. तसेच दहशतीने देश जिंकताही येत नाही. ज्या पद्धतीने यंत्रणा वापरली जातेय, ही लाज आणणारी गोष्ट आहे. शासनाचा इतका हस्तक्षेप चांगला नाही. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही, हे अधिकाऱ्यांनी पण लक्षात ठेवावं. पोलीस अधिकारी असो, वा कोणताही आतला कर्मचारी असो, सत्तेचा अमर पट्टा कोणीही घेऊन आलेला नसल्याचे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मतदान केंद्रावरील गैरप्रकार प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुद्दाहून मशीन स्लो केलं जातंय, जिथे मराठी मतं कमी पडत आहेत असं कळतंय तिथे पण वोटिंग स्लो केलं जात असल्याचा आरोपही  जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या