मुंबई : राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान तीन दिवसांवर असताना राष्ट्रीय पक्षांनीच अद्याप जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राज्यातील प्रादेशिक पक्षांच्या जाहीरनाम्याच्या अजूनही प्रतीक्षा आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) मध्ये भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) या दोन पक्षांनीच आपले जाहीरनामे जाहीर केले आहेत. प्रादेशिक पक्षांना जाहीरनामा जाहीर करण्यासाठी वेळ का लागतोय ? प्रादेशिक पक्ष आपले जाहीरनामे कधी जाहीर करणार?
19 एप्रिल राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान होत असताना सुद्धा प्रादेशिक पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झालेले नाहीत. तर दुसरीकडे राष्ट्रीय पक्षांमध्ये काँग्रेसने 6 एप्रिल ला आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता तर भाजपने 14 एप्रिल ला आपला जाहीरनामा जाहीर केला होता. मात्र राज्यातील प्रादेशिक पक्षांकडून अद्यापही जाहीरनामा संदर्भात तारीख निश्चित झालेली नाही. खरं तर मतदानाच्या आधी हे जाहीरनामे यासाठी प्रसिद्ध केले जातात जेणेकरून पक्षाची भूमिका नेमकी काय आहे सत्तेत आल्यावर नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार याची माहिती मतदारांना मिळते. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा जाहीरनामा महत्त्वाचा ठरतो.मात्र अजूनही जाहीरनामा प्रादेशिक पक्षांनी प्रसिद्ध न केल्याने या संदर्भात चर्चा होऊ लागली आहे
दोन ते तीन दिवसांमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होण्याची शक्यता
राज्यातील पहिल्या टप्प्यात जिथे मतदान होणार आहे त्या मतदार संघामध्ये बहुतांश जागांवर उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांचे असल्याने प्रादेशिक पक्षांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यास वेळ घेतला आहे. महाविकास आघाडीमध्ये आता राज्यातील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचा एकत्रित दोन ते तीन दिवसांमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती आहे.
अजित पवार गटाचा जाहीरनामा कधी होणार प्रसिद्ध?
राज्यातील मुद्द्यांवर भर देत हा एकत्रित जाहीरनामा महाविकास आघाडीकडून प्रसिद्ध केला जाईल, असं सांगण्यात आलाय. तर महायुतीमध्ये भाजपचा जाहीरनामा जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा सुद्धा जाहीरनामा लवकरच जाहीर केला जाणार आहे. 20 किंवा 21 एप्रिल दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याचं सांगण्यात आल आहे
जाहीरनामा गुलदस्त्यात
त्यामुळे पहिल्या टप्प्यात जरी राष्ट्रीय पक्षांसोबत प्रादेशिक पक्षांची जाहीरनामे प्रसिद्ध झाली नसले तरी दुसऱ्या टप्प्यात जेव्हा प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांसाठी मतदान होणार आहे. त्यावेळी हा विकास आघाडीतील एकत्रित जाहीरनामा महायुतीतील प्रादेशिक पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होतील. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचे धोरण त्यांच्या भूमिका हे जाहीरनामा प्रसिद्ध होईपर्यंत गुलदस्त्यात आहेत.
हे ही वाचा :