Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाची यादी जाहीर झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यभरातील 17 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे. एबीपी माझानं काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आणली होती. एबीपी माझाच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब झाला आहे. 


शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे."






ठाकरेंचे कोणते शिलेदार लोकसभेच्या रिंगणात? 



ठाकरे गटाकडून आज लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण अद्याप चार ते पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे. वंचितच्या भूमिकेनंतर या चार ते पाच जागांवरील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांच्या वतीनं मिळत आहे. अशातच ठाकरेंकडून कल्याणच्या जागेसाठीही अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. कल्याणमध्ये महायुतीकडून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जवळपास निश्चित आहे. श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कल्याणमध्ये ठाकरेंकडून लोकसभेच्या रिंगणात कोण उतरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


दक्षिण मध्य मुंबईत ठाकरेंना शह देण्यासाठी महायुतीकडून मनसे रिंगणात? 


महायुतीनं राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 45 लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्याचं धोरण ठेवलं आहे. यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून नवा मित्र जोडला जात आहे. मनसेला मुंबईतील दक्षिण मुंबईची जागा दिली जाण्याची चर्चा आहे.  राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीनंतर मनसेचा महायुतीत समावेश दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडला जाण्याची शक्यता आहे. अशावेळी मनसेचा दक्षिण मुंबईतील उमेदवार कोण असणार, याची चर्चा रंगली आहे. सद्यपरिस्थितीत राज ठाकरे यांचे विश्वासू आणि मुंबईच्या राजकारणात ओळखीचा चेहरा असणाऱ्या बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळू शकते. याशिवाय, शिंदे गट आणि भाजपमध्ये ज्याच्यावरुन वाद सुरु असलेला ठाणे मतदारसंघही मनसेला सोडला जाईल, अशी कुजबूज सुरु आहे. 


दक्षिण मुंबईतून अरविंद सांवत यांना ठाकरेंनी रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे मनसे महायुतीत सामील झाली तर अरविंद सावंत विरोधात मनसे नेते बाळा नांदगावकर रिंगणात उतरतील, अशा चर्चा आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी महायुतीकडून मनसेला युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याचं बोललं जात आहे. 


ईडीचा सेसेमिरा, तरीही अमोल किर्तीकर ठाकरेंकडून रिंगणात 


शिवसेना ठाकरे गटाने अखेर आज आपल्या 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत पक्षातील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या विद्यमान खासदार निवडणूक लढवणार असून नव्या चेहऱ्यांनादेखील संधी देण्यात आली आहे. ईडी चौकशीच्य फेऱ्यात अडकलेले ठाकरे गटाचे शिलेदार अमोल किर्तीकर यांनादेखील पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच ईडीने  किर्तीकर यांना समन्स बजावले असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.


शिवसेना ठाकरे गटाने अखेर आज आपल्या 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत पक्षातील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या विद्यमान खासदार निवडणूक लढवणार असून नव्या चेहऱ्यांनादेखील संधी देण्यात आली आहे. ईडी चौकशीच्य फेऱ्यात अडकलेले ठाकरे गटाचे शिलेदार अमोल किर्तीकर यांनादेखील पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच ईडीने  किर्तीकर यांना समन्स बजावले असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.


नाशिकमधून राजाभाऊ वाजे ठाकरे गटाचे उमेदवार


ठाकरे गटाने नाशिक मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik Politics) जिल्ह्याला राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप कायम असताना ठाकरे गटाने आपला खंदा शिलेदार मैदानात उतरवला आहे.