Gunratna Sadavarte, Worli : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी ठाकरे गटाचे आदित्य ठाकरेंविरोधात (Aditya Thackeray) शड्डू ठोकलाय. वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. शिवाय महायुतीतील शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी सदावर्ते यांनी पक्षश्रेष्ठींकडे  मागणी केली.


2019 मध्ये आदित्य ठाकरेंचा वरळी विधानसभा मतदारसंघातून मोठा विजय 


वरळी विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत 89248 मतं मिळवत आदित्य ठाकरेंनी मोठा विजय मिळवला होता. दरम्यान विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे मंत्री देखील झाले होते. त्यामुळे आता वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्या ठाकरे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर महायुतीकडून वकील गुणरत्न सदावर्ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. 


मनसेकडून संदीप देशपांडे यांचे नाव चर्चेत


वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे आमदार आहेत. मात्र, आदित्य ठाकरेंविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी वरळीमध्ये सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरेंनी मनसे नेते संदीप देशपांडे यांचे तोंडभरुन कौतुक केले होते. तर दुसरीकडे राजे ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील वरळीतून विधानसभा लढू शकतात, असंही बोललं जात आहे. दरम्यान, आता वरळीतूनआता गुणरत्न सदावर्ते हे लढणार असल्याने वरळी विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. 


वरळी विधानसभेतून वकील गुणरत्न सदावर्ते लढणार 


महायुतीतील शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी सदावर्ते यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली मागणी


वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे आमदार आहेत 


मनसे कडून संदीप देशपांडे हे देखील लढणार असल्याची चर्चा 


त्यातच वरळी विधानसभेमध्ये आता गुणरत्न सदावर्ते हे लढणार असल्याने वरळी विधानसभा मतदारसंघ चर्चेत


गुणरत्न सदावर्ते हिंदी बिग बॉसमध्ये एन्ट्री करणार


सलमान खान होस्ट करत असलेल्या हिंदी बिग बॉसमध्ये देखील गुणरत्न सदावर्ते एन्ट्री घेणार आहेत. एक गुणरत्न म्हणजे 10 गुणरत्न आहेत, माझं नावचं बास झालं. लोक मला घाबरतात, मी डंके की चोट पे बोलतो, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Badlapur Rape Case : बदलापूर प्रकरणातील शाळेच्या संस्थाचालकांना जामीन मंजूर, पण दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांनी उचललं