लातूर : लातूरच्या (Latur) अहमदरपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विनायकराव पाटील (Vinayakrao Patil) यांनी शरद पवारांच्या (Shard Pawar) राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. विनायकराव पाटील हे भाजपमध्ये कार्यरत होते. पण त्यांनी आता भाजपला रामराम करण्याची निश्चय केलाय. 29 ऑक्टोबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. 


विनायकराव पाटलांना पक्षातील गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय अहमदपूरचे राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासाठी त्रासदायक ठरण्याची चिन्ह आहेत.कारण मागील वेळेस राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले बाबासाहेब पाटील हे अजित पवार गटाचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. बाबासाहेब पाटील यांच्या विरोधात आता विनायकराव पाटलांना राष्ट्रवादीत जाऊन दंड थोपटले आहेत. मतदार संघाची रचना विनायकराव पाटलांची कार्यकर्त्याची फळी आणि शरद पवार यांची मदत या त्रिसूत्री संगम करत विनायकराव पाटील यांनी बाबासाहेब पाटील यांना तगडा आव्हान आत्ताच निर्माण केल्याची चिन्ह आहेत.


कोण आहेत विनायकराव पाटील?


विनायकराव पाटील हे अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत.राज्यमंत्री पदी ही त्यांनी काम केले आहे. विनायकराव पाटील हे पहिल्यांदा 1999 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यानंतर 2014 साली ते अपक्ष म्हणून पुन्हा निवडून आले.  त्यानंतर भाजपात प्रवेश केला होता.भाजपाने 2019 मध्ये अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे तिकीट दिलं होतं. मात्र भाजपातील पक्षांतर्गत गटबाजीचा मोठा फटका त्यांना बसला. भाजपातील दोन बंडखोर उमेदवार निवडणुकीला उभे राहिल्याने 2019 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बाबासाहेब पाटील विजयी झाले. 


यावेळेस ही गटबाजी संपेल आणि आपली उमेदवारी निश्चित होईल अशी आशा विनायकराव पाटील यांना होती. मात्र जिल्हाध्यक्षपदी त्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेले उमेदवार दिलीपराव देशमुख यांची वर्णी लागली. यामुळे विनायकराव पाटील समर्थक गटामध्ये अस्वस्थता वाढली होती. त्यातच भाजपाचे जिल्ह्यामध्ये अनेक गट तट तयार झाल्याने विनायकराव पाटील यांची भाजपामध्ये घुसमट होत होती. त्यातच सगळे विरोधक हे एकत्र आलेत त्यांच्या विरोधात सक्षमपणे उभे राहिल्यास मतदार आपल्या बाजूने येतील हे लक्षात घेत विनायकराव पाटील यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे.


हेही वाचा : 


Latur News : मोठी बातमी : आणखी एका माजी आमदाराने भाजपची साथ सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश!