Uddhav Thackeray, नागपूर : "गद्दारांना 50 खोके आणि आम्हाला 1500 रुपये असं महिला सांगतात. 2014 ला मोदी यांचा आम्ही प्रचार करतो होतो. 15 लाख देणार होते. त्याचे 1500 का झाले?" असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. नागपूर येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
लोकसभा जिंकली, आता विधानसभा जिंकायची आहे
उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभा जिंकली, आता विधानसभा जिंकायची आहे. लोकं मेली तरी चालेल,पण यांना सत्ता हवी. परंपरेनं दसरा मेळावा घेणार, त्यानंतर मी महाराष्ट्र फिरणार आहे. ईडी, सिबीआय यांनी बेजार करायची. बऱ्याच वर्षांनी इथे आलोय. मीडियाला काम करु द्या,त्यांच्यामुळे दिल्लीचे ठग आपल्याला ऐकतील. आपल्या दैवताच्या पुतळ्यांचं अनावरण करण्यासाठी मला बोलवलं, त्याबद्दल धन्यवाद.
रश्मी बर्वेचं प्रमाणपत्र अवैध ठरवलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकावं
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, अजूनही निवडणूक वातावरण तापलं नाही. जेव्हा पेटेल तेव्हा विझलायला वेळ लागेल. फटाके फोडायला दिवाळी अजून बाकी आहे. रामटेक आपण पाच वेळा जिंकलो पण महाविकास आघाडी म्हणून कदरायचं नाही. बाबासाहेब केदार यांना भेटलो होतो. तेव्हा सुनील केदार अपक्ष होते. तेव्हापासून सुनील केदार आमचा सहकारी आहे. रामटेक मागितली, रामटेक दिली. शिवसैनिकांनी काम केलं. रश्मीताईंचा अर्ज बाद झाला. तेव्हा सुनील केदार म्हणाले चिंता करु नका. तेव्हा प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय अवैध होता असं कोर्टाने म्हटलं. आता गुन्हेगार कोण? स्त्यावरून प्रमाणपत्र घेतो का? ज्यांनी रश्मी बर्वेचं प्रमाणपत्र अवैध ठरवलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकावं, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली.
सिनेटची निवडणुक दोन वर्षे पुढे ढकलली होती. शेवटी आम्ही जिंकलो. ईव्हीएम नव्हतं म्हणून सीनेटच्या निवडणुकीत अभविपला कमी मतं मिळाली. रविवारी निवडून होती. कोर्टाने हातोडा मारला. बुधवारी आपण जिंकलो. शिवरायाचा पुतळा दिमाखदार आहे. त्यासाठी शिल्पकाराला धन्यवाद. मधल्या काळात मालवनमघ्ये झालं ते लाजीरवानं होतं. निवडणूक जिंकायची होती. शिवरायाच्या पुतळ्याच पैसे खाल्ले. समितीचा रिपोर्ट आलाय. आमचे मिंदे दाडी खाजवत म्हटले वाऱ्याने पुतळा पडला. वाऱ्याने तुमची दाढी नाही हालत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या