Chandrapur News : चंद्रपूरमधील माउंट कार्मेल कॅान्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानींना (Adani Group) व्यवस्थापनासाठी दिल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत निशाणा साधला आहे. दरम्यान, यावर बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ही शाळा खाजगी असून ती मोफत शिक्षण देण्यासाठी अश्या प्रकारे निर्णय घेतले जातात. यातून अधिक चांगले शिक्षण आणि सोई दिल्या जातील. संजय राऊत (Sanjay Raut) काहीही बोलतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, अशी प्रतिक्रिया देत दीपक केसरकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे.


दरम्यान, याचं मुद्द्यावरून अदानी सिमेंट आणि अदानी फौंडेशन बाबत करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हणत,   या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. घुग्गुस येथील ही शाळा ACC सिमेंट कंपनीने स्थापित केली आहे. ही शाळा पूर्णपणे स्वयं अर्थसहाय्यीत आहे, ती सरकारी नाही. तसेच कुठल्याही प्रकारची सरकारी मदत या शाळेला मिळत नसल्याची माहिती अदानी सिमेंटच्या वतीने देण्यात आली आहे. 


शाळा स्वयं अर्थसहाय्यता प्रकारातील,सरकारी किंवा जिल्हा परिषदेची नाही


ACC सिमेंट कंपनी मध्ये काम करणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आणि घुग्गुस येथील सामान्य घरातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा कंपनीने स्थापित केली होती. ACC सिमेंट ने माउंट कार्मेल या मिशनरी संस्थेला पहिली ते बारावी वर्ग असलेली ही शाळा चालविण्यासाठी दिली होती. दरम्यान, काही वर्षांपूर्वी एसीसी सिमेंट कंपनीची मालकी अदानी समूहाकडे गेली. त्यामुळे ही शाळा देखील अदानी समूहाकडे गेली. त्यामुळे आता ही शाळा अदानी फाउंडेशन द्वारे संचालित करण्याची कारवाई सुरू झाली आहे. याच संदर्भात अदानी फाउंडेशनने व्यवस्थापकीय बदल करण्यासाठीचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागामार्फत सरकारकडे पाठविला होता. या प्रस्तावानुसार अदानी फाउंडेशन आता या शाळेचे व्यवस्थापन बघणार असून 27 सप्टेंबर रोजी या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने आदेश जारी केला आहे. यात शाळेची पटसंख्या आणि शिक्षक दायित्व यासंदर्भात अदानी फाउंडेशनला निर्बंध आणि अटी घालण्यात आल्या आहेत.


ही शाळा स्वयं अर्थसहाय्यता प्रकारातील असून ती सरकारी किंवा जिल्हा परिषदेची नाही. आगामी काळात अदानी फाउंडेशनच्या वतीने या शाळेच्या विकासासाठी अनेक प्रकल्प हाती घेतले जाणार असल्याची माहितीही अदानी सिमेंटच्या मानव संसाधन विभागाने दिली आहे. 


हे ही वाचा 



 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI