Mumbai: सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले की खडाजंगी ठरलेलीच . मात्र , विधानसभेमध्ये आज कामकाज सुरू झालं आणि विरोधी पक्षांनी आणि सत्ताधारी पक्षांना एकमेकांना टोलेबाजी, कोपरखळ्या मारल्यानं सभागृह खळखळून हसल्याचे दिसले . झालं असं की , अजय चौधरी चुकीने विरोधी पक्षांच्या जागेवरती बसले .यावर तिथे त्यांची निवड झाली का असा टोला शंभूराज देसाईंनी मारला .त्यावर अजितदादा शिंदेंच्या जागेवर बसल्याचं पटोले यांनी लक्षात आणून दिलं . त्यावर आमच्याकडे अधून मधून असे अदलाबदल होत असते असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि सभागृहात हशा पिकला .
नेमकं झालं काय ?
विधानसभेचा आज कामकाज सुरू झाल्यानंतर,अजय चौधरी हे चुकून विरोधी पक्ष नेत्यांच्या खुर्चीत बसले .त्यावर शंभूराज देसाई म्हणाले,विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीत अजय चौधरी आज बसले त्यामुळे आम्हाला त्यांचं अभिनंदन करावा लागेल .जर त्यांची तिथे नियुक्ती करण्यात आली असेल तर ..असं शंभूराज देसाई म्हणाले .त्यावर नाना पटोलेंनी जसे अजय चौधरी विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीत बसले तसे अजित दादा एकनाथ शिंदे यांच्या जागेवर बसलेत .त्यामुळे आधी याची माहिती सभागृहात आम्हाला मिळावी असा टोला नाना पटोले यांनी लगावला .यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच शिंदे साहेब म्हणाले होते आमच्यात अदलाबदली चालत असते अशी कोपरखळी मारली .यानंतर सभागृहात हशा पिकला होता .
विरोधकांकडे संख्याबळ नसल्याने विरोधीनेत्याच्या पदावर कोणाची नियुक्ती करणार? करणार की नाही याचे सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे म्हणजे राहूल नार्वेकरांच्या हातात आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर कोण? असा प्रश्न कायम आहे. दरम्यान, संख्याबळ नसले तरी ठाकरे गटाच्या वतीने विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटाने भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना याबाबतचं पत्र देखील देण्यात आलं आहे.