Kunal Kamra New Video: प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा सध्या जोरदार चर्चेत आहे.कुणाल कामराने त्याच्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून सादर केले गेले. त्यानंतर तो वादात सापडला. या व्हिडिओनंतर कुणालच्या ऑफीसची तोडफोड करण्यात आली. त्याचा व्हिडिओ आता कुणाल कामराने शेअर करत पुन्हा दुसरं गाणं गायलं आहे.
कुणाल कामराने तोडफोडीचा व्हिडिओ केला शेअर
कॉमेडियन कुणाल कामरा सध्या जोरदार चर्चेत आहे. कुणाल कामराने त्याच्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं म्हटलं होतं. आता कुणालने त्याच्या सोशल मिडिया एक्स X वरती आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्याने 23 मार्चच्या रात्री स्टुडिओ द हॅबिटॅटवर झालेल्या तोडफोडीचा आणि त्या तोडफोडीनंतर ज्याप्रकारे जल्लोष केला, त्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये "हम होंगे कंगल, हम होंगे कंगल एक दिन" हे गाणे गायलं आहे. यामध्ये 23 मार्च आणि 24 मार्चचे सर्व फुटेज लावण्यात आले आहे.
व्हिडिओमध्ये कुणाल कामरा गाणं म्हणतो, "हम होंगे कंगाल एक दिन. मन में अंधविश्वास देश का सत्यानाश, हम होंगे कंगाल एक दिन. होंगे नंगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर, पुलिस के पंगे चारों ओर एक दिन...मन में नथूराम और हरकतें आशाराम, हम होंगे कंगाल एक दिन. होगा गाय का प्रचार, लेके हाथों में हथियार, होगा संघ का शिष्टाचार, एक दिन...जनता बेरोजगार, गरीबी की कगार हम होंगे कंगाल एक दिन."
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं
शोमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर कमेंट करताना कुणाल म्हणाला होता- 'पहिल्यांदा शिवसेना भाजपमधून बाहेर पडली. त्यानंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. राष्ट्रवादीतून राष्ट्रवादी बाहेर पडली. सगळे गोंधळून गेले. त्याची सुरुवात एका व्यक्तीने केली होती.
कुणाल कामरानं गायलेलं विडंबनात्मक गाणं काय?
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये...
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये...
एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छिप जाये...
मेरी नज़र से तुम देखो, गद्दार नज़र वो आए...
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये...
मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाये...?
जिस थाली में खाए, उसमें ही वो छेद कर जाए...
मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए...
तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे...
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा... हाये...
पुढे बोलताना कुणाल कामरा म्हणाला की, "ये उनकी राजनीति है। वे पारिवारिक कलह को खत्म करना चाहते थे। उन्होंने किसी के पिता को चुरा लिया। इसका क्या जवाब होगा? क्या मैं कल तेंदुलकर के बेटे से मिलूं, भाई, चलो डिनर करते हैं। मैं तेंदुलकर की प्रशंसा करता हूं और उनसे कहता हूं, भाई, आज से वे मेरे पिता हैं।"