मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर (Kolhapur) पोलिसांनी तेलंगणातून अटक केल्यानंतर आज कोल्हापूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी, दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली असून असीर सरोदे यांनी प्रशांत कोरटकरला 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. एकीकडे न्यायालयात सुनावणी होत असताना दुसरीकडे कोल्हापुरातील शिवप्रेमी संतप्त झाले असून कोल्हापुरी पायताण घेऊन न्यायालयाच्या आवारात दिसून आले. कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दोन्ही बाजूच्या सुनावणीनंतर इतिहास अभ्यास इंद्रजीत सावंत (Indrajeet sawant) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, मुख्यमंत्री महोदय म्हणाले होते, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे. मग, चिल्लर माणसाला पकडायला पोलिसांना 1 महिना का लागला? त्यामागे कोणती शक्ती होती याचाही शोध घ्यायला हवा, असे सावंत यांनी म्हटले. 

Continues below advertisement

एक एक महिनाभर हा चिल्लर माणूस सापडत नाही. मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं होतं की हा चिल्लर माणूस आहे. मग, तो फरार कसा होऊ शकतो, एक महिनाभर तो पोलिसांना सापडत का नाही? असा सवाल इंद्रजीत सावंत यांनी विचारला आहे. तसेच, सावंतच्या पाठीमागे कुठली तर यंत्रणा आहे, म्हणूनच हा सापडलेला नाही, असेही सावंत यांनी म्हटले. कोरटकरने अवमानजनक उपमा देत फोन केलेला होता आता हे सिद्ध झालंय आणि त्या व्यक्तीला वाचवणारी कुठली तरी यंत्रणा आहे. म्हणूनच एक महिना झालं तो सापडत नाही आणि एक महिन्यानंतर तो सापडतो. हे सगळं त्याला कुठून इतर सपोर्ट करत असल्याशिवाय होणार नाही, ती कुठली यंत्रणा आहे ती पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे, असे इंद्रजीत सावंत यांनी म्हटलं. 

म्हणून मी हे समाजसमोर आणलं

मी स्वतःहून फोन करायला त्याला सांगायला गेले नव्हते की मला फोन कर आणि असं घाणेरं विषारी वक्तव्य कर. मला रात्री 12 वाजता त्याचा फोन आल्यानंतर पहाटे 3 साडेतीन पर्यंत मला झोपच आली नाही. कारण, महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या बद्दल, शिवरायांच्या बद्दल, शंभूराजांच्या बद्दल असं वक्तव्य करणारी माणसं आहेत, हे माणसं जिवंत आहेत हेच मला पटत नव्हतं. म्हणूनच मी ते समाजासमोर आणलं. ही जी काही घाण आहे ती लपवून ठेवली असती तर जास्त दुर्गंधी येईल, म्हणून मी समाजासमोर आणले. मी माझ्या फेसबुकवर अकाऊंटवर जे लोकांना इजा पोहोचणार होणार नाही, समाजच्या भावना दुखणार नाही, या सगळ्या गोष्टी लिहू शकतो, मांडू शकतो, असेही सावंत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. 

Continues below advertisement

संवैधानिक मार्गाने आंदोलन करावं

महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांबद्दल असं घाणेरडं बोलल्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं. पण तेवढं झालेलं नाहीये, याउलट सगळ्यांनी संयमाने घेतलं आहे. महाराष्ट्रामधील शिवप्रेमी जे आहेत ते शिवाजी महाराजांचे, शाहू महाराजांचे, बाबासाहेब आंबेडकरांचे, महात्मा फुलेंचे अनुयायी आहेत. त्यांच्या विचारांचे अनुयायी आहेत, ते सगळे व्यतीत झाले आहेत. महाराष्ट्रात असली घाण असूच कशी शकते. पण, संवेदनशीलता दाखवून, संवैधानिक मार्गाने याच्याविरुद्ध आपण आंदोलन करावे, असे आवाहनही इंद्रजीत सावंत यांनी केले आहे.

हेही वाचा

शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा