भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना फोटो यांनी भंडारा विधानसभेसह भंडारा जिल्ह्यातील तीनही जागा काँग्रेस पक्ष लढेल असा दावा केला आहे. त्यानंतर 
ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भंडारा विधानसभेवर दावा ठोकलाय. ती हक्काची जागा असून ती सोडणार नसल्याचं पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. किशोरी पेडणेकर यांच्या दाव्यावरून आता महाविकास आघाडीमध्ये भंडाऱ्याच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे.


ज्या जागेवर आमचा शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे, ती जागा आम्ही 99% सोडणार नाही


किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आम्ही सर्व महाविकास आघाडी म्हणून लढतोय. लोकसभेला आम्ही एकत्र लढलोय. नाना पटोले काहीही बोलले असले तरी, ते एका पक्षाचे मुख्य पदाधिकारी आहेत. ते त्यांचं मतं असू शकते. ज्या जागेवर आमचा शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे, ती जागा आम्ही 99% सोडणार नाही, असं आमच्या पक्ष प्रमुखाचं धोरण आहे. शेवटी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र निर्णय घेतील. तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकमेकांचे मत आणि मन सांभाळण्याचं नक्की काम करतील.


शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकादिलानं लढेल आणि गद्दारांना घरी पाठवेल


पुढे बोलताना पेडणेकर म्हणाल्या, भंडाऱ्याच्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं. तो मेसेज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना देणार. इथल्या आमदाराची काय परिस्थिती झाली ती एबीपी माझावर दाखवली. मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या तोंडावर दरवाजा बंद केला. नियती आपलं काम करतेय. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकादिलानं लढेल आणि गद्दारांना घरी पाठवेल. तीन पैकी एक विधानसभा ही आम्ही लढणार. ही इथल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे ती आम्ही सोडणार नाही,असा दावा शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भंडारा विधानसभेबाबत केला. 


पुढारी कितीही बेइमानी करो, मतदार मात्र हलत नाही


लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने काँग्रेससह आणि सर्व पक्षांना धक्के देण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकसभा निवडणुकीत बघितलं मतदार हलला नाही. नांदेडमध्ये सुद्धा काँग्रेसनं भाजपाला धक्का दिला. पुढारी कितीही बेइमानी करो, मतदार मात्र हलत नाही. यावेळी मतदार सुद्धा मशालीवरच मतदान करेल, नक्की खात्री आहे. खिचातानी तर झालीच पाहिजे, त्यावरच पक्षाची ताकद कळेल. कार्यकर्त्यांना बळ मिळते. खिचाखिची तर होईल पण तुटातुटी होणार नाही. त्या पद्धतीनेच आम्ही लढू. महाविकास आघाडीचेच 160 ते 170 जागा निवडून येतील, असा दावा शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. 


संजय शिरसाट आणि भरत गोगावले या दोघांची बोळवण झालीय, हे त्यांना कळून चुकलंय. आणि ज्यांना नाही मिळालंय त्यांनाही कळून चकलंय की आपण फसलो गेलोय. त्यामुळे आम्ही का त्यांचा विचार करावा. कोण शिवले कोण आता घट्ट होतात की सैल होताय हे बघावे लागेल, तो शिंपीचं सांगू शकेल. त्यामुळं त्याची चिंता आम्हाला आता नाही. आम्हाला इथल्या जनतेला कसं फसवल गेलंय, या जनतेचा कसा विश्वासघात केलाय या जनतेला परत कसा विश्वास दिला जाईल याचा आम्ही विचार करू. विश्वासघातानं गेलेल्या लोकांचा आम्ही विचार करत नाही, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांना मिळालेल्या महामंडळाच्या पदावरून लगावला.


इतर महत्वाच्या बातम्या 


Bombay High Court : मोठी बातमी, आयटी कायद्यातील घटना दुरूस्ती असंविधानिक ती रद्द करा, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला मोठा दणका