Nashik Teachers Constituency Election 2024 नाशिक: नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झडत आहे. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) हे पप्पू आहेत. त्यांच्या जन्मापासून मी शिक्षण क्षेत्रात काम करतो. मी काय केले हे विचारण्याचा अधिकार माझ्या शिक्षक मतदारांना आहे. त्यामुळे पप्पूंनी विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर कसे देऊ, अशी खिल्ली विवेक कोल्हे यांनी केलेल्या आवाहनाला उत्तर देत महायुती आणि एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) यांनी उडवली. तसेच विवेक कोल्हेंच्या घरात 73 सालापासून सत्ता आहे. त्यांनी काय केले? असा प्रतिसवाल देखील किशोर दराडे यांनी उपस्थित केला. 


पैठणी, नथ, ड्रेस वाटपाची चौकशी करावी निवडणूक आयोगाने त्यावर लक्ष ठेवावे. यंदाच्या निवडणुकीत शिक्षकांना बदनाम करण्याचा काम सुरु असल्याचंही किशोर दराडे यावेळी म्हणाले. दरम्यान, शिक्षक मतदारसंघातील  अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) यांची उमेदवारी ही राजकीय खेळी असल्याचेही किशोर दराडे यांनी सांगितले. गेल्या सहा वर्षांत मतदारसंघातील 70 टक्के शाळांना व शिक्षकांना भेट देवून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम मी केले आहे. त्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्यास मी बांधील आहे. पप्पूच्या प्रश्नांवर उत्तर देण्यास मी बांधील नाही, अशी टीका विवेक कोल्हे यांचे नाव न घेता किशोर दराडे यांनी केली.


आचारसंहिता कक्ष अलर्ट मोडवर-


शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आचारसंहिता कक्ष सतर्क झाले आहे. काही उमेदवारांकडून मतदारांना भेटवस्तू देऊन आमिष दाखविले जात असल्याच्या तक्रारीवरून आचारसंहिता कक्ष अलर्ट मोडवर आला आहे. आचारसंहिता कक्ष प्रमुखाचे शिक्षण उपसंचालक आणि नाशिक विभागातील जिल्हाधिकारी यांना तक्रारीचे पत्र पाठवण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातील तक्रार असली तरी इतर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आचारसंहिताचा भंग झाल्यास कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 


नाशिक शिक्षक मतदारसंघातील जिल्हानिहाय मतदार संख्या-


नंदुरबार :- 5 हजार 393


धुळे :- 8 हजार 159


जळगाव :- 13 हजार 122


अहमदनगर :-  17 हजार 392


नाशिक :- 25 हजार 302


एकूण मतदार :- 69 हजार 368


आणखी वाचा 


नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या प्रचाराची आज सांगता, महायुती अन् मविआच्या मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला