Bhandara News भंडारामुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) आज भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara News) दौऱ्यावर आहेत. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं आज त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. तब्बल 547 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करून ते एकप्रकारे विदर्भात शिवसेना निवडणूकीची तयारीलाच सुरुवात करत आहे. अशा वेळी एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी विदर्भात किमान 15 आणि राज्यात 100 विधानसभा जागांची अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केले आहे.


विदर्भात किमान 15 आणि राज्यात 100 विधानसभा जागा शिवसेनेला 


दरम्यान, भोंडेकर यांनी स्वतः मात्र पुढील निवडणूक ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तीर कमान चिन्हावर लढवणार, की अपक्ष लढवणार याचा निर्णय झालेला नसल्याचे मत व्यक्त केले आहे. सध्या तांत्रिकदृष्ट्या अपक्ष आमदार असलो तरी तरी भविष्यात शिवसेनेच्या तीर कमान या चिन्हावर निवडणूक लढवायची की पुन्हा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जायचं हे कार्यकर्त्यांशी बोलून ठरवू, असे भोंडेकर म्हणाले. आज भंडारामध्ये ज्या विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री करत आहे, त्यामध्ये गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरवर जल पर्यटनाचा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प ही आहे. या जलपर्यटनाच्या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असा दावाही भोंडेकर यांनी केला आहे.


जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पासह विविध विकासकामांचे भूमिपूजन 


वैनगंगेच्या विस्तीर्ण पात्रावर असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरवर जागतिक दर्जाचं पर्यटन प्रकल्प होत आहे. भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर हा प्रकल्प होत असल्याने दोन्ही जिल्ह्यातील सुमारे दहा हजारापेक्षा अधिक बेरोजगारांना येथे रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी 102 कोटींचा पहिला टप्पा प्राप्त झाला असून त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होत आहे. वैनगंगेच्या तीरावर होत असलेल्या भूमिपूजन सोहळा स्थळावर मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. तर स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या भूमिपूजन सोहळ्याच्या अनुषंगाने सज्ज झाली आहे. रेल्वे मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य जाहीर सभा होत आहे. 


यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या माध्यमातून या सभेचं आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सावंत यांच्या स्वागताचे भंडारा शहरामध्ये ठिकठिकाणी मोठे मोठे बॅनर आणि होर्डिंग लावण्यात आलेली आहे. तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जोरदार तयारी करण्यात आली आहे. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्प जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देणारा असून अनेक रोजगाराच्या संधी ही निर्माण करणारा ठरणार आहे. त्यामुळे या महत्वकांशी,  प्रकल्पाची साऱ्यांनाच प्रतीक्षा लागली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या