Kisan Kathore on Badlapur Case : बदलापूरमध्ये  चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान आज सकाळपासून रेल्वे स्थानकावर बदलापूरसह अनेक भागातील लोकांनी रेल्वे रोको केलाय. अजूनही बदलापूर रेल्वे स्थानकावरिल परिस्थिती जैसे थे आहे. पोलिसांकडून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र आंदोलक रेल्वे स्थानकावरुन हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. आजूबाजूच्या शहरातील पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, या प्रकरणावर भाजप आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


किसन कथोरे काय काय म्हणाले? 


किसन कथोरे म्हणाले, सकाळी आंदोलन भरटकलं. शाळा बाजूला राहिली आणि रेल्वेमध्ये घुसले. रेल्वेमध्ये घुसलेले आरोपी बदलापूरचे राहिवासी नाहीत. सगळी बाहेरुन आलेली मंडळी आहे. शाळेतील वातावरण आता शांत झालं आहे. शाळेतील मुख्याध्यापकावर कारवाई झाली. कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. संस्थाचालकांची चौकशी सुरु केली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करण्यास सुरुवात केली. ठरवून केलेली राजकीय स्टंटबाजी आहे. बदलापूरकरांना आज वेठीस धरण्यात आलं आहे. हे योग्य नाही. सर्वांना माझी विनंती आहे, शांतता राखावी. या प्रकरणाचे कोणीही राजकारण करु नये. स्वत: उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आदेश दिले असतील. नागरिकांनी संयम पाळला होता. बाहेरुन आलेल्या मंडळींनी रात्रीत बॅनर तयार केले आणि बदलापूरमध्ये लागले. लाडकी बहीणचं मानधन देऊ नये, आम्हाला न्याय द्यावा. हे बॅनर उल्हासनगर वगैरे भागातून आले. हे कोणीतरी ठरवून केलं. 


देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?


गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांची त्वरित नियुक्ती करण्यात आली आहे.तात्काळ चार्जशीट दाखल करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल. अशा नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकार आणि पोलीस विभाग प्रयत्नशील राहील.


बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत, असंही सीएमओ ऑफिसकडून सांगण्यात आलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या दिशेने बाटली भिरकावली, बदलापुरात आंदोलकांचा रुद्रावतार; 'फाशी द्या'च्या घोषणा सुरुच