Arvind Kejriwal: पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळविल्यानंतर आम आदमी पक्षाचे लक्ष गुजरात निवडणुकीकडे (Gujarat Assembly Elections 2022) लागले आहे. तसेच आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने छत्तीसगड या आदिवासीबहुल राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकाही लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे पंजाबमधील मान सरकार अॅक्शन मोड मध्ये आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या पहिल्याच मंत्रमंडळाच्या बैठकीनंतर मोठा निर्णय घेत 25,000 सरकारी नोकऱ्या देणार असल्याचे जाहीर केले आहे.


याच दरम्यान आज अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या आमदारांसोबत व्हर्चुअल बैठक घेतली. या बैठकीला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) आणि आपचे नेते राघव चढ्ढाही उपस्थित होते. बैठकीत केजरीवाल यांनी मान यांच्या कामाचे कौतुक केले आणि म्हणाले, 'भगवंत मान यांनी 16 तारखेला शपथ घेतली, लोकांना 3 दिवसांत काम करून दाखवले. जुन्या मंत्र्यांची सुरक्षा काढून ती जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली. ऑक्टोबरमध्ये पिकांची नासाडी झाली. याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांमध्ये पोहोचवण्यात आली आहे. तीन-चार दिवसांत शेतकऱ्यांना धनादेश प्राप्त होतील.''


पंजाबमध्ये भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू झाली


व्हर्च्युअल बैठकीत आप आमदारांशी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, ''पंजाबमध्ये भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. 25,000 नोकऱ्या जाहीर झाल्या, लोकांच्या आमच्याकडून असलेल्या अपेक्षा आता विश्वासात बदलत आहेत.'' बैठकीत भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, ''एकीकडे भगवंत मान यांनी शपथ घेतली आणि त्यांनी कामालाही सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे 4 राज्यात विजयी झालेल्या भाजपला सरकारही बनवता आले नाही. सध्या त्यांच्यात मारामारी सुरू आहे.''


महत्त्वाच्या इतर बातम्या :