बँगलोर : सेक्स सीडीच्या आरोपावरून मंत्री रमेश जारकीहोळ यांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकात राजकीय खळबळ माजली आहे. नोकरीच्या बदल्यात रमेश यांनी महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. दरम्यान आता कर्नाटक सरकारच्या अन्य सहा मंत्र्यांनी न्यायालयात धाव घेत आमच्या विरोधात बदनामी करणार्‍या सामग्रीचे प्रकाशन, प्रसारण थांबवावे, अशी विनंती केली आहे. या संदर्भात न्यायालयाने 67 माध्यमांना आदेश दिला आहे.


ज्या सहा मंत्र्यांनी दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यात शिवरा हब्बर, बीसी पाटील, एचटी सोमशेखर, के सुधाकर, नारायण गौडा, बायरथी बसवराज यांची नावे आहेत. हे सर्व मंत्री काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर गटाचा भाग आहेत. जुलै 2019 मध्ये काँग्रेस-जेडीएसचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस समर्थित सरकार पडले होते.


Ramesh Jarkiholi | बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल


विशेष म्हणजे रमेश जारकीहोळी कर्नाटक सरकारमधील जलसंपदामंत्री होते. कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली महिलेवर लैंगिक छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. यासंदर्भातील सीडी सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहल्ली यांनी प्रसिद्ध केली. त्यानंतर राज्यातील येडियुरप्पा सरकार विरोधकांच्या दबावाखाली आले. काँग्रेस सातत्याने जारकिहोळी यांच्या राजीनाम्याची मागणी करत होती. याशिवाय त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे.


Ramesh Jarkiholi Resigns | बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा


मात्र, या प्रकणामध्ये त्यांना अडकवण्यात आल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले. नैतिक मूल्यांच्या आधारे मी राजीनामा दिला असून मी निर्दोष सिद्ध होईल याचा मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


Ramesh Jarkiholi | बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल