Kangana Ranaut slapped : अभिनेत्री आणि मंडी लोकसभेची खासदार कंगना रणौत हिला कानशिलात लगावणे CISF महिला जवानाला चांगलेच महागात पडले आहे. CISF मधून तिचे निलंबन करण्यात आले. चंदीगड विमानतळावर भाजप नेत्या आणि अभिनेत्री कंगना राणौतला थप्पड मारल्याप्रकरणी सीआयएसएफने महिला जवानाला निलंबित केले आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली असल्याचे सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


काय म्हणाली होती कंगना राणौत ?


नमस्कार मित्रांनो, मला फार फोन कॉल येत आहेत. शुभचिंतक आणि मीडियातील लोक माझ्यासी संपर्क करत आहेत. सर्वांत पहिल्यांदा सांगते की, मी सुरक्षित आहेत. आज जो प्रसंग  झाला.  तो सेक्युरिटी चेक जवळ झाला. मी तिथून जात असताना दुसऱ्या कॅबिनमधील एक महिला होती जी सीआयएसएफची सुरक्षा कर्मचारी होती. तिने मला क्रॉस करण्याची वाट पाहिली. त्यानंतर ती माझ्यासमोर आली आणि माझ्या कानशिलात लगावली. त्यानंतर मला ती शिव्या देखील देत होती. मी तिला विचारले की, तिनं असं का केलं? तेव्हा तिने सांगितलं की, मी शेतकरी आंदोलनाला सपोर्ट करते. मला आता पंजाबमध्ये वाढणाऱ्या आंतकवादाबद्दल चिंता वाटू लागली आहे. 


लोकसभा निवडणुकीत कंगनाची बाजी 


लोकसभा निवडणुकीत कंगना रणौतला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. मंडी लोकसभा मतदारसंघातून तिला मैदानात उतरवण्यात आले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत कंगनाने मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे बॉलिवूड गाजवल्यानंतर आता दिल्ली गाजवायला कंगना सज्ज झाली आहे. कंगनाची मंडीतून संसदेत ग्रँड एन्ट्री झाल्याने सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण तिचे काही चाहते मात्र नाराज झाले आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कंगनाने घोषणा केली होती,"निवडणूक जिंकले तर बॉलिवूड सोडून देईन". त्यामुळे आता मंडीकरांना दिलेलं आश्वासन पूर्ण करत राजकारणातच स्वत:ला झोकून देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कंगनाने लोकसभेचं मैदान मारलं आहे. त्यामुळे आता ती बॉलिवूडचं मैदान सोडणार का? याकडे सर्वांच्याच नजरा आहेत.




इतर महत्वाच्या बातम्या 


Bharat Gogavle On Nilesh Rane: 'एकनाथ शिंदेंमुळे नारायण राणेंना लोकसभेचं तिकीट, राणे बंधूंनी सांभाळून बोलावे, अन्यथा...'; भरत गोगावलेंचा इशारा