Election : आगामी निवडणुकांसाठी ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना काही दिवासांपूर्वी जाहीर झाली. मागील निवडणुकीत चार नगरसेवकांचा एक वॉर्ड होता. यंदा तीन वॉर्डचा एक प्रभाग झाल्याने नगरसेवकांच्या संख्येत 131 वरून 142 पर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान ठाण्यातल्या वॉर्डरचनेवरुन जितेंद्र आव्हाडांनी शिवसेना नेते आणि ठाण्याच्या आयुक्तांवर हल्लाबोल केला आहे. 'माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला' असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील शिवसेना नेत्यांवर केला आहे.


ठाण्यातील प्रभागरचनेनंतर एबीपी माझाशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'ठाण्यात आघाडी व्हावी हे माझंही मत आहे. पण ज्यांना युती करायचीच नसेल, तर आम्ही काय करु शकतो. आमचा राजकीय खून करण्याचा प्रत्यन होणार असेल तर मी तर मी माझा बचाव करणारच.' असं आव्हाड म्हणाले. तसंच 'माझ्याच मतदार संघात तुम्ही माझ्या 23 जागा 18 वर आणता, माझ्या पाच जागा तुम्ही कमी करता. असं म्हणत फडणवीसांच्या काळातही एवढा त्रास झाला नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे. तसंच वॉर्डरचना करताना मुस्लीम जनतेबाबत द्वेष दिसत आहे, असा आरोपही ठाणे पालिका आयुक्तांसह आणि शिवसेना नेत्यांवर जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.


सर्व प्रभागरचनांमध्ये असाच प्रकार


ठाणे पालिका प्रभागरचनेबाबत बोलत असताना आव्हाड यांनी, प्रभागरचनेदरम्यान राजकीय हस्तक्षेप नाही झाला पाहिजे. तसंच जे ठाण्यात झालं तेच नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवलीमध्ये होत आहे. असं आव्हाड म्हणाले. तसंच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणार नाही, असं म्हणत काहीजण 100 जागा जिंकण्याची स्वप्न बघत स्वत:ला चाणक्य समजतात, असा टोला आव्हाड यांनी लगावला. या सर्व आरोपानंतर युती झालीच पाहिजे असं म्हणत जिंतेद्र आव्हाड यांनी आगामी निवडणूकांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युती होणार का? हे गुलदस्त्यात ठेवलं आहे. 


 


हे ही वाचा : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha