Karnataka Hijab Row : कर्नाटकासह संपूर्ण देशात 'हिजाब'चा (Hijab) मुद्दा चांगलाच पेटलांय. हिजाबबाबत सुरू झालेल्या वादानंतर आता एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. हिजाब बंदीचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) निर्णयाच्या विरोधात असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी मुस्लीम तरुणींंना सल्लाही दिला


आज नतमस्तरक झालो तर कायम नतमस्तक होऊ - ओवेसी
ओवेसी म्हणतात, एक मुस्लीम मुलगी हिजाब घालून मोटारसायकलवरून येते, असा व्हिडिओही आज आम्ही पाहिला. ती कॉलेजमध्ये येताच हे २५-३० लोक तिच्याजवळ आले आणि तिला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. या मुलीच्या शौर्याला माझा सलाम. हे काही सोपे काम नव्हते. कारण त्या मुलीने त्या तरुणांकडे पाहिले आणि 'अल्ला हू अकबर - अल्ला हू अकबर' म्हणाली. त्यामुळे माझा मुद्दा लक्षात ठेवा, कारण  आज नतमस्तक झालात तर कायम नतमस्तक व्हाल. असा सल्ला ओवेसींनी मुस्लिम तरुणींना दिला. 


वोटिंगच्या बळावर हक्क मिळेल
ओवेसी म्हणाले की, जेव्हा तुम्ही मताची ताकद दाखवाल तेव्हा जग तुमचा हक्क तुम्हाला देईल. एक दिवस आपलाही सूर्य उगवेल हे लक्षात ठेवा.  असे ओवेसींनी आपल्या भाषणात सांगितले. 


वाद वाढतोय


कर्नाटकमध्ये महाविद्यालयांमध्ये हिजाबबाबत वातावरण सतत बिघडत आहे. इथे सगळ्यांना महाविद्यालयाच्या ड्रेस कोडनुसार येण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मुस्लिम मुली हिजाब घालून आल्या आणि त्यावरून वाद सुरू झाला. त्यानंतर सरकारने तीन दिवस शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा आदेश काढला. या प्रकरणी अनेक हिंदू संघटना निदर्शनेही करत आहेत.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या :