Jayant Patil on Vishwajeet Kadam, Sangli : "महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा आणि बुरखा उतरवायचा असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात भाजपविरोधात लढलं पाहिजे. कोणाची तरी इच्छा होती, मान्य झाली नाही. पण त्याच्यासाठी आपण आपली दिशा बदलू शकत नाही. आपण ठामपणे चंद्रहार पाटील यांचे काम केले पाहिजे. स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा आपण केली तर पंचायत होईल. लोक काय म्हणतात हे महत्वाचं नाही", असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या प्रचारार्थ सांगलीत सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), खासदार संजय राऊत (Sanjay Raut), काँग्रेस नेते विश्वजीत कदमही उपस्थित होते. 


विवेकबुद्धी जागृत ठेऊन काम केलं पाहिजे


जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, विवेकबुद्धी जागृत ठेऊन काम केलं पाहिजे. माझ्या पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटील यांचे काम केलं पाहिजे. दुसरं काही केलं तर माझा शेवटचा नमस्कार असेल. भाजपचा पराभव करताना शिवसेना आणि काँग्रेस सोबत पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात 10 जागा लढवतोय. तिथे काँग्रेस आणि शिवसेना आम्हाला साथ देत आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही सर्व मित्र पक्ष हातात घालून काम करतोय. अपवाद फक्त सांगलीचा आहे. हा मतदारसंघ काँग्रेस आणि शिवसेनेच्या चर्चेमध्ये सेनेकडे गेला. शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. हा पक्षाचा निर्णय आहे, आघाडीचा निर्णय एकट्या शिवसेनेचा निर्णय नाही, असंही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्ट केलं. 


मला 13 ते 14 जागा पाहिजे होत्या


पुढे बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, कम्युनिष्ट पक्ष आम्हाला मदत करत आहे. त्यामुळे आघाडीचा भंग होणार नाही, याचा प्रयत्न मान्यवर नेत्यांनी केला पाहिजे. एखाद्याला राज्य पातळीवर नेतृत्व करायचे असेल तर त्याने तेवढा ठामपणा दाखवायचा असतो. लोकांना वाटतं की मी उद्धवजींना उमेदवार दिला. मी तुम्हाला सांगितलं की, काँग्रेसची जागा तुम्ही घ्या. मला 13 ते 14 जागा पाहिजे होत्या. पण आम्हाला मिळाल्या नाहीत. 




इतर महत्वाच्या बातम्या 


Chandrahar Patil on Vishal Patil : मला हरवण्यासाठी विशाल पाटलांना भाजपचं पाकिट, शेतकऱ्यांच्या मुलाविरोधात दोन दरोडेखोर, विश्वजीत कदमांच्या उपस्थित चंद्रहार पाटलांचा हल्लाबोल