Jayant Patil: राज्यातील अवाढव्य वीज दरावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारला घेरले आहे. इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्या वीज महाग मिळत  असल्याचं ट्वीट करत आताच्या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे त्यामुळे वीजदर कमी करण्यात आता कोणतीही अडचण नसावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे. वीज बिलात 30% कपात करणार, पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असे म्हणणारे आज प्रचंड बहुमताने सत्तेत बसले आहेत. सध्या राज्यात असलेले अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता सरकारला कोणतीही अडचण नसावी! असं म्हणत त्यांनी हे ट्वीट केलंय.


विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर EVM हॅकींगसह अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारला घेरताना दिसत आहे. दरम्यान, इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्र वीज महाग असल्याचं ट्वीट करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अवाढव्य वीज दारावरून जयंत पाटील यांनी सरकारला घेरल्याचं दिसलं. दरम्यान, राज्याची उपराजधानी नागपुरात येत्या 16 ते 21 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात वाढत्या वीजेचा मुद्दा विरोधक रेटतील अशी चर्चा आहे.


काय केलीय जयंत पाटलांनी पोस्ट?


प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, वीज बिलात 30% कपात करणार असे महायुती सरकारमधील लोकं मागच्या 4-5 महिन्यांपासून म्हणत आहेत. 30% कपात सोडाच पण इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रात सध्या वीज महाग मिळत आहे.राजस्थानमध्ये प्रति युनिटला 7.55 - 8.95 रुपये मोजावे लागत आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये 3.34 ते 6.80 रुपये मोजावे लागत आहेत. शेजारच्या कर्नाटक राज्यात तर सरसकट प्रति युनिट 5.90 रुपये आहेत. सर्वात जास्त वीजदर म्हणजे प्रति युनिट 5.16 ते 17.79 रुपये महाराष्ट्रात मोजावे लागत आहेत.


 






वीज बिलात 30% कपात करणार, पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असे म्हणणारे आज प्रचंड बहुमताने सत्तेत बसले आहेत. सध्या राज्यात असलेले अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता सरकारला कोणतीही अडचण नसावी!