Jaya Bachchan : राज्यसभेतील कार्यकाळ संपत आलेल्या खासदारांमध्ये जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा देखील समावेश आहे. राज्यसभेचे सभापती प्रदीप धनकड यांनी बच्चन यांच्याबाबत भाष्य केले होते. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. दरम्यान, जया बच्चन यांनी राज्यसभा टर्मच्या शेवटच्या भाषणात त्यांनी सर्वांनी माफी मागितली. शिवाय, मला राग येतो. पण मला वैयक्तिकरित्या कोणालाही दुखवायचे नसते, असे जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी स्पष्ट केले आहे. 


काय म्हणाल्या जया बच्चन?


जया बच्चन (Jaya Bachchan) राज्यसभेत म्हणाल्या, "लोक मला नेहमी विचारतात की, तुला एवढ्या लवकर राग का येतो. हा माझा स्वभाव आहे. मी स्वत:ला बदलू शकत नाही. मला एखादी गोष्ट आवडली नाही किंवा मी सहमत नसेल तर पटकन बोलून जाते. जर मी कोणासोबत योग्य पद्धतीने व्यवहार ठेवला नसेल तर मी तुम्हा सर्वांची माफी मागते. 


राज्यसभेचे सभापती काय म्हणाले?


राज्यसभेचा कार्यकाळ संपत असलेल्या खासदारांच्या योगदानाबाबत बोलताना उपराष्ट्रपती प्रदीप धनकड म्हणाले, त्यांनी मांडलेले विचार नेहमी आठवत राहतील. खासदारांचा कार्यकाळ संपत असल्याने पोकळीही निर्माण होणार आहे. प्रत्येक सुरुवातीला अंत असतो आणि प्रत्येक शेवटाला सुरुवात असते, असे मत प्रदीप धनकड यांनी व्यक्त केले.  राज्यसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एक प्रश्न सोडण्यात आला होता. त्यावर काँग्रेसच्या खासदाराला धनकड यांनी खडे बोल सुनावले होते. त्यानंतर जया बच्चन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते.


"जर सदस्यांना मुद्दा समजवण्यात आला असता तर त्यांच्या लक्षात आले असते. ती शाळेतील मुलं नाहीत. खासदारांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे," असे जया बच्चन म्हणाल्या. जया बच्चन स्वत:च्या अनुभवाबद्दल सांगताना म्हणाल्या, 20 वर्षे म्हणजे आयुष्यातील मोठा कालावधी असतो. मला अनेक चांगले वाईट अनुभव आले. माझे कुटुंब फार मोठे झाले आहे, हा सर्वांत चांगला अनुभव होता. हे वरिष्ठ गृह नेहमी समृद्ध रहावे, अशी आशा व्यक्त करते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Miss World : मुंबईत रंगणार 'मिस वर्ल्‍डची' ग्रॅण्‍ड फिनाले, जिओ वर्ल्‍ड कन्‍वेंशन सेंटरमध्ये होणार आयोजन