एक्स्प्लोर

Jay Pawar: 'Dad माझा प्रत्येक काळ, आज आणि येणारा प्रत्येक उद्या...', जय पवार वडिलांच्या आठवणीने व्याकूळ, पोस्ट करत सांगितली ती मनातली गोष्ट

Jay Pawar: तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील.", असे जय पवार यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar and Jay Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज नऊ दिवस उलटून गेले. मात्र अद्यापही त्यांच्या अपघाती निधनानं राज्य अद्याप सावरलेलं नाही, या नऊ दिवसांच्या काळात राज्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) राजकीय घडामोडी घडल्या, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्याचबरोबर त्यांच्यावर पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून जबाबदारी आली. या दु:खातून सावरत असतानाच आता अजित पवार (Ajit Pawar) यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांची एक सोशल मिडीयावरील पोस्ट व्हायरल होत आहे. जय पवार (Jay Pawar) यांनी आपल्या फेसबुकवरून फोटो शेअर केला आहे, वडिलांसोबत बोलतानाचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. यासोबत जय पवार यांनी काही मजकूरही लिहला आहे. यामध्ये म्हटले आहे की, "Dad माझा प्रत्येक काळ, आज आणि येणारा प्रत्येक उद्या तुमचाच आहे. तुमची प्रचंड आठवण येते. तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील.", असे जय पवार यांनी म्हटले आहे. जय पवार यांची ही पोस्ट पाहून कार्यकर्ते, नेते आणि नागरिक भावूक झाले आहेत.(Jay Pawar shared memory)

बारामतीत विमान लॅंड होत असताना अपघात

उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी मुंबईवरून बारामती येथे येत असताना 28 जानेवारीला त्यांच्या विमानाचा अपघात झाला होता. विमान लँड होत असतानाच विमान अपघात झाला, विमान धावपट्टीवर उतरताना कोसळले होते. यानंतर विमानाचा प्रचंड स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर मोठा आघात झाला होता. 29 जानेवारीला अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. 

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. अजित पवार यांच्याकडील उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांच्या मंत्रि‍पदीही सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांनी सोमवारी कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवड पुढल्या एक महिन्याच्या आधी करण्याच्या हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. अर्थसंकल्प अधिवेशन कालावधीतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष निवडणूक पार्टी अंतर्गत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, पार्टीचे पत्र राज्यातील पदाधिकारी तसंच राष्ट्रीय कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या सहमतीने सुनेत्रा पवार यांची निवड बिनविरोध होणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. 

 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
Rohit Pawar : भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजल्याबद्दल प्रशांत किशोर यांचं मनःपूर्वक अभिनंदन!, रोहित पवार यांची सूचक पोस्ट
भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजल्याबद्दल प्रशांत किशोर यांचं मनःपूर्वक अभिनंदन!, रोहित पवार यांची सूचक पोस्ट
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Parbhani : परभणी जिल्हा बँकेत 14 वर्षांनंतर बोर्डीकरांची एंट्री; इतिहासात पहिल्यांदाच बँक भाजपच्या ताब्यात
परभणी जिल्हा बँकेत 14 वर्षांनंतर बोर्डीकरांची एंट्री; इतिहासात पहिल्यांदाच बँक भाजपच्या ताब्यात

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget