Jalna:  राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय पेटलेला असताना आणि मराठा आरक्षणासाठीच्या पश्चिम दौऱ्याला अवघे 3 दिवस उरले असताना सरकारकडून आता आम्ही आरक्षणाची आशा सोडली आहे. त्या मला आरक्षण देत नाहीत आणि सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी देखील करत नाहीत. सरकारनं आतापर्यंतचे सर्व आणि सरसकट गुन्हे मागे घ्यावेत असं मनोज जरांगे(Manoj Jarange) म्हणालेत. आमचे अनेक लोक विनाकारण गुंतवले आहेत असं म्हणत सरसकट गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी पुढे रेटली. अंतरवली सराटीतून ते बोलत होते. त्यांच्याकडून कसली अपेक्षाच नाही. आणि सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी ही ते करत नाहीत. असं मनोज जरांगेंनी म्हंटल आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा पश्चिम दौरा कसा होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

  


मराठा आरक्षणासाठी केलेल्या आमरण उपोषणादरम्यान आंदोलकांवर पोलिसांकडून लाठी चार्ज झाला होता. या आंदोलनात सहभागी असलेल्या मराठा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. यात अनेक मराठा आंदोलकांना खोट्या गुन्ह्याखाली अडकवल्याचा मनोज जरांगे यांनी आरोप केला होता. याआधी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी उत्तरही सादर केले होते. 


7 ऑगस्ट पासून पश्चिम दौऱ्याला होणार सुरुवात 


मराठा आरक्षण प्रश्न पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगे घेऊन जाणारा असून 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात ते शांतता रॅली काढणार आहेत. मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात आठवडाभर दौरा करणार आहेत. सोलापूर पासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून नाशिकमध्ये समारोप होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


असा असेल जरांगेंचा दौरा    


मनोज जरांगे पाटील हे सात ऑगस्ट रोजी सोलापूर येथे शांतता रॅली काढणार असून मुक्काम सोलापुरात असणार आहे. त्यानंतर 8 ऑगस्ट रोजी सांगली, 9 ऑगस्ट रोजी कोल्हापूर, 10 ऑगस्ट रोजी सातारा जिल्हा, 11 ऑगस्ट रोजी पुणे, 12 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर आणि 13 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात या शांतता यात्रेचा समारोप होणार आहे. सांगावा आलाय पाटलांचा , पुढील मोहिमेचा... अशा पद्धतीने सोशल मीडियावर हा मेसेज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात फिरू लागला असून जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामुळे अनेक नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. लोकसभेत जरांगे पाटील यांच्या निरोपाने महायुतीमधील अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला होता. आता विधानसभेपूर्वी जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याने महायुतीमधील आमदारांचे टेन्शन वाढणार असे चित्र दिसून येते.


हेही वाचा:


मनोज जरांगेकडे एवढा पैसा येतो कुठुन? ओबीसी आरक्षण आंदोलक नवनाथ वाघमारेंचा सवाल, म्हणाले, जरांगेंचं नियोजन स्क्रीप्टेड..